Assembly Election Voting : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेला मतदानात वाढ

Maharashtra Election 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघांत बुधवारी (ता. २०) मतदान झाले. यंदा ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार होते.
Election Vote
Election VoteAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत सरासरी ७१.०८ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कर्जत-जामखेडला, तर कमी मतदान पारनेरला झाले आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची स्थिती पाहता लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेतही मतदान वाढले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघांत बुधवारी (ता. २०) मतदान झाले. यंदा ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार होते. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ३६ लाख ५९ लाख ०४ मतदार होते. २३ लाख २१ हजार ०७९ मतदारांत १२ लाख ७० हजार ०१८ पुरुष व १० लाख १५ हजार ०१३ महिलांनी मतदान केले होते. यंदा नेवासा मतदार संघात सर्वाधिक मतदान वाढले. लोकसभेपेक्षाही सर्वच मतदारसंघात टक्केवारी वाढली.

Election Vote
Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत मतदानात वाढ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अकोले मतदार संघात ६८.४१ टक्के मतदान झाले. त्या तुलनेत यंदा ३.५६ टक्के, तर यंदाच्या लोकसभेपेक्षा १२.१५ टक्के मतदान वाढले.

संगमनेर विधानसभा मतदार संघात पाच वर्षांपूर्वी ७१.९९ टक्के मतदान झाले. यंदा त्यापेक्षा २.५५ टक्के तर लोकसभेपेक्षा ८.७७ टक्के मते वाढली. शिडी विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी विधानसभेला ७०.९८ मतदान झाले होते. त्यापेक्षा यंदा ३.५४ टक्के, तर लोकसभेपेक्षा १०.७५ टक्के मते वाढली आहेत.

कोपरगावला पाच वर्षांपूर्वी विधानसभेला ७६.३८ टक्के मतदान झाले. यावेळी ४.९१ टक्के मतदान घटले असून लोकसभेपेक्षा मात्र तब्बल १५.२ टक्के मतदान वाढले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात पाच वर्षांपूर्वी ६४.१७ टक्के मतदान झाले. यंदा त्यापेक्षा १.१७ टक्के, तर लोकसभेपेक्षा १.११ टक्के मतदान वाढले. नेवाशाला पाच वर्षांपूर्वी विधानसभेला ८०.०४ टक्के मतदान झाले. यंदाही तेवढेच मतदान झाले आहे. लोकसभेपेक्षा मात्र तब्बल १६.६ टक्के मते वाढली आहेत.

Election Vote
Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

शेवगाव-पाथर्डीला पाच वर्षांपूर्वी विधानसभेला ६६.१८ टक्के मतदान झाले. यंदा त्यापेक्षा १.९७ टक्के, तर लोकसभेपेक्षा ५.४७ टक्के मते वाढली आहेत. राहुरीला पाच वर्षांपूर्वी विधानसभेला ६८.७२ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यापेक्षा ५.७८, तर लोकसभेपेक्षा ४.७१ टक्के मते वाढली आहेत. पारनेरला गतवर्षीपेक्षा ७०.४४ टक्के मते झाली होती. यंदा ४.१७ टक्क्यांनी घट झाली असून लोकसभेपेक्षा २.३ टक्के वाढले.

अहिल्यानगर शहरात पाच वर्षांपूर्वी विधानसभेला ५८.७५ टक्के मतदान झाले. त्यापेक्षा यंदा २.३, तर लोकसभेपेक्षा ८.६७ टक्के मतदान वाढले आहे. श्रीगोंद्याला पाच वर्षांपूर्वी विधानसभेला ६७.७३ टक्के मतदान झाले. यंदा त्यापेक्षा ४.५५ टक्के, तर लोकसभेपेक्षा ९.७४ टक्के अधिक मते झाली आहेत. कर्जत-जामखेडला ६७.७३ टक्के मतदान झाले. यंदा त्यापेक्षा ७.४४ टक्के, तर लोकसभेपेक्षा ९.३६ टक्के मतदान वाढलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com