Tur Market : तेजीनंतर आता तुरीचा बाजार दबावात

Tur Rate : अवकाळी तसेच मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्याने गेल्या हंगामातील तुरीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला. नैसर्गिक वातावरणाचा फटका बसल्याने देखील तुरीची उत्पादकता प्रभावित झाली.
Tur Market
Tur MarketAgrowon

Nagpur News : गेल्या महिनाभर तेजीत असलेले तुरीचे दर काहीसे दबावात आले आहेत. दर्जानिहाय हा दर कमीजास्त होत असल्याचे व्यापारी सांगत असले तरी जूनच्या सुरुवातीला १२ हजारांपेक्षा अधिक दर असलेल्या तुरीत आता प्रतिक्‍विंटल ९०० रुपयांपर्यंतची घट नोंदविली गेली आहे.

यवतमाळ बाजार समिती तुरीचे व्यवहार ११२०० ते ११२५५ रुपयांनी होत आहेत. अवकाळी तसेच मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्याने गेल्या हंगामातील तुरीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला. नैसर्गिक वातावरणाचा फटका बसल्याने देखील तुरीची उत्पादकता प्रभावित झाली. प्रक्रियेकामी अपेक्षित दर्जाचा कच्चा माल उपलब्ध होत नसल्याच्या परिणामी बाजारात तुरीच्या दरात मोठे चढ-उतार अनुभवले जात आहेत.

Tur Market
Tur Market : अकोल्यात तुरीला सरासरी ११ हजारांचा दर कायम

यवतमाळ बाजार समितीचा विचार करता सात जून रोजी या बाजारात तुरीचे दर ११५०० ते ११९२५ रुपयांवर होते. त्यानंतर मात्र तुरीच्या दरात घट नोंदविली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. १०५०० ते ११५९५, ११६०० या दराने त्यानंतरच्या काळात तुरीचे व्यवहार झाले. शुक्रवारी (ता. २७) मात्र या दरात मोठी घट होत ते ११२०० ते ११२५५ रुपयांवर आले.

प्रतिक्‍विंटल सुमारे ८०० ते ९०० रुपयांची घट दरात नोंदविण्यात आली. नागपूरच्या कळमना बाजार समितीचा विचार करता ३१ मे रोजी या ठिकाणी उच्चांकी १०५०० ते १२४०० रुपयांनी तुरीचे व्यवहार झाले. त्यानंतर आतापर्यंत १०५०० ते ११८०० रुपयांनी तूर विकली जात असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

Tur Market
Tur Market: तुरीच्या बाजारातील तेजी कायम

शेगाव (बुलडाणा) बाजार समितीत तूर ८०० ते ११८०० रुपयांवर होती. दबावात असलेल्या तुरीच्या दरात सद्यःस्थितीत काहीशी सुधारणा अनुभवली जात असून याचे दर १०००० ते ११८०० रुपयांवर आले आहेत. कारंजा (वाशीम) बाजाराचा विचार करता या ठिकाणी आवक ३०० क्‍विंटलवर आली आहे. दर किमान १०१०० तर कमाल ११५७० होते. याउलट चांदूरबाजार (अमरावती) बाजाराचा विचार करता या ठिकाणी तुरीचे दर ९००० ते ११९०० रुपयांवर होते.

अमरावतीत उच्चांकी १२ हजारांचा दर

विदर्भातील बहुतांश बाजारांत तुरीचे दर काहीसे दबावात असतानाच अमरावती बाजार समितीत आवक आणि दरही उच्चांकी असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी दररोज सरासरी ११२१ क्‍विंटलची आवक होत असल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले. या बाजारात तुरीला ११५०० ते १२००० रुपयांचा दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com