Maharashtra Election : नव मतदारांच्या संख्येत मालेगावात वाढ

New Voter Update : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासाठी सप्टेंबरमध्ये नावनोंदणीची संधी देण्यात आली होती.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Agrowon
Published on
Updated on

Malegaon News : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासाठी सप्टेंबरमध्ये नावनोंदणीची संधी देण्यात आली होती. ऑनलाइन नावनोंदणी करणाऱ्या मतदारांच्या नावांचा समावेश विधानसभेच्या पुरवणी मतदार यादीत करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या अंतिम पुरवणीनुसार, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात ३ लाख ८० हजार ५७६, तर मध्य मतदारसंघात ३ लाख ४२ हजार ७१३ मतदार आहेत. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या याद्यांच्या तुलनेत मालेगाव मध्यमध्ये २ हजार ८९० व मालेगाव बाह्यमध्ये ६ हजार ५८९ नवीन मतदारांची वाढ झाली आहे. नवीन मतदारांची नोंदणी करणे, दुबार व मृत नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Election Assembly : नाशिक जिल्ह्यात १५ जागांसाठी १९६ उमेदवार रिंगणात

प्रारूप याद्यांवरील हरकती निकाली काढून ३० ऑगस्टला अंतिम यादी जाहीर झाली. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात ३ लाख ७३ हजार ९८७, तर मध्यमध्ये ३ लाख १३ हजार ६८ मतदार होते. मात्र, संपूर्ण सप्टेंबर महिन्यात नवीन मतदारांना नाव नोंदणीची संधी देण्यात आली होती.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election : ‘स्वावलंबी, स्वाभिमानी महाराष्ट्र उभारणार’

त्यानुसार ऑनलाइन नावनोंदणी करणाऱ्या मतदारांच्या नावांचा समावेश विधानसभेच्या पुरवणी मतदार यादीत करण्यात आला आहे.

पुरवणी मतदार यादीनुसार मालेगाव मध्य मधून ३ लाख ४२ हजार ७१३, तर मालेगाव बाह्य मध्ये ३ लाख ८० हजार ५७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, अशी मालेगाव मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर व मालेगाव बाह्यच्या निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com