Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये आगीचा हाहाकार सुरूच असून येथे जंगलाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. आतापर्यंत १३१६ हेक्टर जंगलाला आग लागली असून मुख्यमंत्री धामी यांनी बैठक बोलावली आहे.
Uttarakhand Forest Fire
Uttarakhand Forest FireAgrowon

Pune News : उत्तराखंडच्या जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. येथे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनास अपयश येताना दिसत असून मुख्यमंत्री धामी यांनी बुधवारी (ता. ०८) बैठक बोलावली आहे. तसेच जंगलांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्राऊंडवर उतरून काम करण्यासह लष्कराची मदत घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

मुख्यमंत्री धामी म्हणाले की, राज्यातील जंगलांना लागलेली आग ही मोठी समस्या बनली आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. ते आम्ही जनतेच्या विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर पेलू. आग विझवण्यासाठी आम्ही सर्व पर्यायांवर काम करत आहोत. तर आग लावणाऱ्या बेशिस्त घटकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तत्पूर्वी राज्यातील जंगलातील आगीच्या घटना पाहता मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम पुढे ढकलले.

Uttarakhand Forest Fire
Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

यादरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ते मंगळवारी डेहराडूनला होते. रात्री मुख्यमंत्री धामी परतले असून बुधवारी राज्य सचिवालयात ते मान्सून तयारीचा आढावा घेतील. तसेच राज्यातील जंगलांमध्ये लागलेल्या आगीच्या बाबतीत देखील माहिती घेणार आहेत. यानंतर रुद्रप्रयाग येथे जाऊन चारधाम यात्रेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर आगग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करणार आहेत.

वेताळ घाट ब्लॉकच्या सिलटोनाच्या जंगलात लागलेली आग रविवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास लोकवस्तीच्या परिसरात पोहोचली. आग लोकवस्ती जवळ पोहचल्याने ५० हून अधिक कुटुंब भीतीच्या छायेखाली आली आहेत. तर ग्रामस्थांकडून पाण्याची पाईप लाईन कापून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्री दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच गावकऱ्यांनी आपल्या बागा आणि गवताचे ढिगारे जळण्यापासून वाचवले आहेत.

दरम्यान, तडीखेत ब्लॉकमधील धुरा, हरतापा, बाजेडी, घनियाकोट आणि मलौना येथील जंगले आगीच्या कवेत आली आहेत. यामुळे ग्रामस्थांना वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आगीमुळे ओक, बर्च, देवदार आणि कफळाची झाडे जळून खाक झाली आहेत. तर भावली महामार्गावरील टेकडीला लागलेल्या आगीमुळे दरड कोसळ्याची भीती आहे.

सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे धूराचे लोट पसरले असून जाळालेली झाडे पडत आहेत. हळदवणी ते पदमपुरी येथे बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनावर जळते झाडे पडल्याने चालक बालबाल बचावला. वाहनावर झाडं पडताच इतर चालकांनी त्याला बाहेर काढले. यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे.

Uttarakhand Forest Fire
Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

पाचड (परेली) जाळण्यावर बंदी

राज्यातील जंगलातील आग आटोक्यात आणण्यात प्रशासन गुंतले असून धूराच्या टोलाने प्रदुषण वाढत आहे. यामुळे नैनितालच्या डीएम वंदना सिंह येथे पुढील आदेश येईपर्यंत पाचड जाळण्यावर बंदी आहे. यावेळी डीएम सिंह म्हणाल्या की, जवळच्या भागात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतातील पेंढा आणि पाचड जाळण्यास बंदी घातली आहे. ही बंदी पुढील आदेश येईपर्यंत असेल. यामुळे सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. तर शेतात आग लावणाऱ्यांवर वनविभाग, महसूल विभाग, पोलीस आणि कृषी विभाग लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी कृषी, महसूल, पोलीस आणि इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तसेच घनकचरा किंवा इतर कचरा जाळू नये अशा सूचना करताना, पेट्रोल पंप, कारखाने, गोदाम परिसराच्या १०० मीटरच्या परिघात कचरा, भुसा, कोरडी पाने इत्यादी त्वरित काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वनविभागाची रात्रीही गस्त

नैनिताल परिसरात लागलेल्या आगीनंतर वनविभागाची टीम अलर्ट झाली असून वनविभागाकडून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात येणार आहे. यावरून डीएफओ चंद्रशेखर जोशी यांनी सांगितले की, विभागाची अनेक पथके रात्रीही गस्त घालत असतात. वाळलेली पाने जंगलातील आग प्रवण क्षेत्रातून काढली जात आहेत. दुसरीकडे व्याघ्र प्रकल्पातील कलागढमध्ये जंगले आणि वन्यजीवांचे आगीपासून संरक्षण व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी जंगलातील आगीपासून सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com