Flower Market : गुढीपाडव्यामुळे फुलबाजार फुलला

Gudhi Padwa Festival : गुढीपाडव्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फुलबाजार फुलला आहे.
Flower Market
Flower Market Agrowon

Pune News : गुढीपाडव्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फुलबाजार फुलला आहे. पाडवा मंगळवारी (ता. ९) साजरा होत असला तरी गेल्या तीन चार दिवसांपासून फुलांची आवक, मागणी आणि दर वाढले आहेत.

यामुळे दुष्काळी परिस्थीत फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाडव्यानिमित्त पुणे बाजार समितीमधून फुलांची खरेदी वाढली आहे.

Flower Market
Flower Market : झेंडू फुलांच्या विक्रीत पदरी निराशा; अनेक उत्पादकांचा निघाला नाही खर्च

पुणे शहर व उपनगरासह कोकणातून फुलांना विशेष मागणी वाढली आहे. यामध्ये झेंडू, शेवंती, गुलछडी या हारांसाठी विशेष वापर असलेल्या फुलांचा समावेश आहे.

Flower Market
Flower Market : बाजारपेठेत फुलांना मागणी वाढली

पाडव्यानिमित्त घरगुती वापरासह दुकाने शोरूम सारख्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये सजावटीसाठी फुलांना मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. यामध्ये गुलछडीला प्रतिकिलोला ४०० रुपयांपर्यंत दर असल्याचे फुलांचे आडतदार सागर भोसले यांनी सांगितले.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे

झेंडू : २०-६०, गुलछडी : ३००-४००, अॅष्टर : जुडी ४०-५०, सुट्टा १५०- २५०, कापरी : २०-६०, शेवंती : १००-२५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी ३०-५०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-१५०, जर्बेरा २०-४०, कार्नेशियन ५०-१५०, शेवंती काडी १५०-२५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com