Jayakwadi Dam : आवक वाढल्याने जायकवाडीच्या विसर्गात वाढ

Jayakwadi Dam Water Storage : जायकवाडी प्रकल्पात आवक वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे. प्रकल्प अपेक्षेनुसार तुडुंब झाल्याने पाणीसाठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न प्रकल्प प्रशासनाकडून सुरू आहेत.
Jayakwadi Dam
Jayakwadi Dam Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : जायकवाडी प्रकल्पात आवक वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे. प्रकल्प अपेक्षेनुसार तुडुंब झाल्याने पाणीसाठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न प्रकल्प प्रशासनाकडून सुरू आहेत.

यंदा पुन्हा एकदा जायकवाडी प्रकल्प तुडुंब झाल्याने सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याची आशा बळावली आहे. प्रकल्पाला डावा आणि उजवा असे दोन कालवे असून डाव्या कालव्याची लांबी २०८ किलोमीटर असून, त्यावर एक लाख ४१ हजार हेक्टर, तर उजव्या कालव्याची लांबी १३२ किलोमीटर असून, त्यावर ४१ हजार हेक्टर सिंचन अपेक्षित आहे.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्प तुडुंब!

रविवारी (ता. २०) सकाळी सहाच्या सुमारास प्रकल्पात ५९०४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती, तर ७३३६ क्युसेकने पाणी गोदावरी पात्रात १४ गेटमधून सोडण्यात येत होते. सोमवारी (ता. २१) सकाळी सहाच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात आवक वाढून १२ हजार ५७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

त्यामुळे प्रकल्पाच्या १८ गेटमधून १८,८६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. तर, सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास १८ दरवाजे उघडून ९४३२ क्युसेकने विसर्गात वाढ करण्यात आली.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडीचे पुन्हा उघडले १८ दरवाजे

जायकवाडीचे ६० व्या वर्षांत पदार्पण..

मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी प्रकल्पाने (नाथसागर) शुक्रवारी (ता.१८) ५९ वर्षे पूर्ण करून ६० वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने नाथसागराचा ६० वा वाढदिवस हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर उत्तर यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कडाचे प्रशासक समाधान सब्बीनवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, जालना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती कोकरे, उपकार्यकारी अभियंता बुधवंत, कडाचे उपप्रशासक दीपक डोंगरे, धरण अभियंता विजय काकडे आदी उपस्थित होते.

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी १८ ऑक्टोबर १९६५ रोजी नाथसागरचे भुमिपूजन केले होते. तर माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. १९७६ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्राला प्रकल्प अर्पण करण्यात आला होता. त्याचे स्मरण म्हणून जलसंपदा विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी एकत्रित येऊन नाथसागरावर मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com