Chhatrapati Sambhajinagar News : तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे १२ दिवसांपूर्वी १३ सप्टेंबरला बंद केलेले १८ दरवाजे बुधवारी (ता. २५) पुन्हा उघडण्यात आले. या दरवाजातून ९४३२ क्युसेकने गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरला दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान एकूण ६ गेट ०.५ फूट उंचीने उघडून ३१४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पुन्हा विसर्गात वाढ करण्यासाठी आणखी ६ गेट्स अर्ध्या फुटाणे उघडण्यात आले. त्यामध्ये गेट ०.५ फूट उंचीने उघडून आणखी ३१४४ क्युसेक विसर्ग वाढ करण्यात आली होती. अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सध्या एकूण १२ दरवाजांमधून ३१४४ अधिक ३१४४ असा एकूण ६२८८ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
मंगळवारी (ता. १०) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास पुन्हा सूचना देत विसर्गात वाढ करण्याचा निर्णय प्रकल्प प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार सकाळी ठिक ११.३० ते १२ वाजे दरम्यान आणखी एकूण ६ गेट ०.५ फूट उंचीने उघडून ३१४४ क्युसेक विसर्ग वाढ करण्यात आली होती. अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सध्या एकूण १८ गेटमधून ६२८८ अधिक ३१४४ असा एकूण ९४३२ असा क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. ११ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता प्रकल्पाच्या १८ गेटमधून ९४३२ दिवसांत सांडव्यातून तर ६०० क्युसेकने उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. १२ सप्टेंबरला १८ दरवाजांतून ९४३२ क्युसेकने, तर उजव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग कायम होता.
१२ सप्टेंबरलाच सायंकाळी सहा वाजेपर्यंत मात्र १८ पैकी ६ दरवाजे बंद करून ६ दरवाजांतून ३१४४ क्युसेकने, तर उजव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. शुक्रवारी (ता. १३) सकाळी सहाच्या सुमारास सहा दरवाजांतून ३१४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. रविवारी (ता. २२) पुन्हा जायकवाडीच्या नदीपात्रात गेटद्वारे पाणी सोडण्याचा व त्यासाठी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी (ता. २४) सकाळी सहाच्या सुमारास जायकवाडीत ६०० क्युसेकने सुरू असलेली आवक बुधवारी (ता. २५) सकाळी सहाच्या सुमारास ४१६९ पोहोचली. त्या वेळी प्रकल्प प्रशासनाकडून प्रकल्पाचे १२ गेट अर्ध्या फुटाणे उघडून ६२८८ विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्याच वेळी उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने माजलगाव प्रकल्पासाठी विसर्ग सुरू असल्याने एकूण विसर्ग ६७८८ वर पोहोचला होता.
दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजता २०९६ क्युसेकने निसर्गात वाढ करण्यात आली. आधीची ९४३२ क्युसेकने व वाढविलेली २०९६ क्युसेकने मिळून ११,५२८ क्युसेकने विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू करण्यात आला होता.
धरणातील साठा पोहोचला १०२.५५ टीएमसीवर
बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पुन्हा गेट सहा दरवाजे उघडून त्यामधून ३१४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे एकूण विसर्ग ९४३२ क्युसेक वर पोहोचला होता. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा ७६.४९ टीएमसी तर एकूण पाणीसाठा १०२.५५ टीएमसी झाला होता. प्रकल्पात क्षमतेच्या तुलनेत ९९.७८ टक्के पाणीसाठा झाला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.