Broiler Lifting Rates : ब्रॉयलर पक्ष्याच्या लिफ्टिंग दरात वाढ

Market Update : नवरात्रातील ९ दिवसांत ब्रॉयलर पक्ष्याच्या लिफ्टिंग दरात घट नोंदविण्यात आली होती. त्यात दिवाळीपासून तेजी आल्याने कुक्‍कुट व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
Broiler
BroilerAgrowon
Published on
Updated on

Amravati News : नवरात्रातील ९ दिवसांत ब्रॉयलर पक्ष्याच्या लिफ्टिंग दरात घट नोंदविण्यात आली होती. त्यात दिवाळीपासून तेजी आल्याने कुक्‍कुट व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. ८७ ते ९० रुपयांवरून हे दर १०० ते १०५ रुपयांवर आल्याची माहिती कुक्‍कुट व्यावसायिक शुभम महाले यांनी दिली.

किरकोळ चिकन व्यावसायिक पोल्ट्री व्यावसायिकांकडून जिवंत पक्ष्यांची खरेदी करतात. नवरात्रातील दिवसांत मागणीत घट झाल्याचे कारणामुळे जिवंत कुक्‍कुट पक्ष्यांच्या लिफ्टिंग दरात मोठी घट नोंदविण्यात आली होती. सुमारे ८७ ते ९० रुपये प्रति किलो असा जिवंत पक्ष्यांचा दर होता.

Broiler
Broiler Poultry Business : दुष्काळी माणमध्ये आधुनिक ‘पोल्ट्री’

आता मात्र हेच दर १०० ते १०५ रुपयांवर पोहोचले आहेत. दिवाळीच्या काळात मागणीत वाढ झाल्याने जिवंत पक्ष्यांचे दर १११ रुपये प्रती किलोपर्यंत गेले होते, असेही शुभम महाले यांनी सांगितले. किरकोळ विक्रेत्यांकडून चिकनची विक्री २७० ते २८० रुपये दराने होत आहे. सरासरी दोन किलो वजनाच्या जिवंत कोंबडीपासून ४५० ते ६०० ग्रॅमपर्यंत विनाकामाचे अवशेष मिळतात. ही एकप्रकारची घट असल्याने त्यामुळेच किरकोळ विक्रीचा दर हा अधिक असतो, असेही त्यांनी सांगितले.

Broiler
Broiler Chicken Productivity : ब्रॉयलर चिकनच्या उत्पादकता खर्चात वाढ

सोयापेंड मका दरात घसरण

सोयापेंड आणि मक्‍याचा वापर पोल्ट्री फिडमध्ये केला जातो. दोन महिन्यांपूर्वी सोयापेंडचे दर ३८ रुपये किलोवर होते आता त्यात घट होऊन दर ३३ रुपयांवर आले आहेत. मका तीन हजार रुपयांवरून २२५० ते २३०० रुपयांवर आला आहे. परिणामी, उत्पादकता खर्चात कपात झाली आहे. सध्या उत्पादकता खर्च ७८ रुपयांवर आल्याचे श्री. महाले यांनी सांगितले.

पोल्ट्री फीडकामी लागणारा मका आणि सोयापेंडच्या दरात घसरण झाली आहे. परंतु संगोपनकामी असलेल्या एक दिवसाच्या पक्ष्यांचे दर मात्र ३१ रुपयांवरून ४४ रुपयांवर आले आहेत. ही उत्पादकता खर्चातील मोठी वाढ आहे. त्याच कारणामुळे राज्यातील ९ लाखांपैकी मोठ्या प्रमाणावर वैयक्‍तिक कुक्‍कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हा व्यवसाय बंद केला आहे. आता केवळ करारावरील कुक्‍कुटपालन करणारेच या व्यवसायात आहेत.
शुभम महाले, संचालक, अमरावती पोल्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com