Agriculture Modern Technology : आधुनिक तंत्रज्ञानाने शेती उत्पन्न वाढवा

कृषी विभाग जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती विक्रमगड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Palghar News : पालघर जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा असून शेतकऱ्यांनी कृषी विभागातील विविध उपयुक्त योजनांचा लाभ घ्यावा. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढवावे, असे प्रतिपादन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे यांनी केले.

विक्रमगड तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. शिबिरातील शेतकरी व पशुपालक यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पन्न वाढवणे तसेच सेंद्रिय शेतीबाबत पावडे यांनी मार्गदर्शन केले.

इतर मागासवर्गीय घटकांना लाभ मिळण्याकरिता नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील, असे आश्वासित केले.

Indian Agriculture
Nutrition Tracker App : पोषण ट्रॅकरमध्ये राज्यात पालघर जिल्हा दुसरा

कृषी विभाग जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती विक्रमगड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत हे शिबिर साखरे समाजमंदिर भडांगे पाडा येथे पार पडले.

विक्रमगड पंचायत समितीचे सभापती यशवंत कनोजा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा आरोग्य व बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे, पंचायत समिती विक्रमगड उपसभापती विनोद भोईर, जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले.

या वेळी पंचायत समिती सदस्य सुभाष भोये, अंजली भोये, नम्रता गोवारी, मनोज बोरसे, गटविकास अधिकारी हणमंतराव दोडके, सहाय्यक गटविकास अधिकारी ईश्वर पवार, कृषी अधिकारी पी. एस. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोनावले, डॉ. प्रशांत कांबळे, प्रादेशिक पशू संवर्धन सहआयुक्त गोरेगाव वैद्यकीय अधिकारी डॉ. कारले, डॉ. शरद आसवले व पशुधन पालक, शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com