Nutrition Tracker App : पोषण ट्रॅकरमध्ये राज्यात पालघर जिल्हा दुसरा

केंद्रपुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ९७ टक्के लाभार्थ्यांची माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये यशस्वीरीत्या नोंदवण्यात आली.
Nutritional Diet
Nutritional DietAgrowon
Published on
Updated on

Palghar News : केंद्रपुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत (Child Development Services Schemes) पालघर जिल्ह्यातील ९७ टक्के लाभार्थ्यांची माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये यशस्वीरीत्या नोंदवण्यात आली. हे उल्लेखनीय काम केल्याबद्दल पालघर जिल्ह्याने राज्य स्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

यानिमित्त प्रशस्तिपत्र देऊन बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सचिव आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, महिला बालविकास अधिकारी प्रवीण भावसार अंगणवाडी सेविका शीतल पाटील यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.

Nutritional Diet
PM Poshan Shakti : शालेय पोषण आहार योजना आता ‘पीएम पोषण शक्ती’

महिला व बालविकास विभागातर्फे पोषण पंधरवडाअंतर्गत विविध उपक्रम मागील वर्षी राबवण्यात आले होते. त्यादरम्यान पोषण ट्रॅकर अॅपमध्ये उपक्रमांची नोंदणी घेणे बंधनकारक होते.

पालघर जिल्ह्यातून १ जानेवारीपासून दोन लाख १२ हजार लाभार्थ्यांपैकी दोन लाख पाच हजार जणांची नोंदणी करण्यात आली. या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष, महिला आणि बाल कल्याण समिती सभापतींकडून महिला व बालविकास विभागाचे कौतुक करण्यात आले.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका यांना त्यांच्या ग्रुपवर नेहमी मार्गदर्शक सूचना देऊन त्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्यात प्रवीण भावसार यांचे त्यांना सहकार्य लाभले. यामुळे पालघर जिल्हा हे धेय गाठू शकला. पुढच्या वेळी अव्वल येण्याचा प्रयत्न असेल.
भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com