River Linking Project : वाशीम जिल्ह्याचा नदीजोड प्रकल्पामध्ये समावेश करा

Former MLA Vijay Jadhav : वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने वाशीम जिल्ह्याला नदीजोड प्रकल्पात समाविष्ट करावे.
River Water Project
River Water Project Agrowon
Published on
Updated on

Washim News : वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने वाशीम जिल्ह्याला नदीजोड प्रकल्पात समाविष्ट करावे, अशी मागणी माजी आमदार विजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.

River Water Project
Savitri River : सावित्री नदीच्या पाणी पातळीत घट

वाशीम जिल्हा पठारी प्रदेशात स्थित असल्यामुळे येथे धरणे किंवा तलाव यांच्या स्वरूपातील सिंचन पद्धती उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील शेतकरी शेतीसाठी पूर्णपणे नैसर्गिक जलस्रोतांवर अवलंबून आहेत.

River Water Project
Water Project Stock : कोल्हापुरातील बहुतांश लघू प्रकल्‍प भरले

पाण्याचा पुरेसा साठा नसल्यामुळे शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तसेच बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. दुष्काळी परिस्थिती बघता नाईलाजाने काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.

केंद्र सरकारद्वारे पूर्वीच जाहीर केलेल्या यादीनुसार वाशीम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष लक्ष देऊन आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती पाहता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे, असेही श्री. जाधव यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com