Jowar Cultivation : खरीप ज्वारी लागवडीचा समावेश ‘रोहयो’त करा

Farmer Leader Demands MGNREGA Coverag: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. त्या पत्रानुसार, विकसित कृषी अभियानाच्या प्रारंभाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.
Jowar Farming
Jowar CultivationAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : खरिपात ज्वारी लागवड क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने पेरणी ते कापणी पर्यंतच्या कामांचा समावेश रोजगार हमी योजनेत करावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. त्या पत्रानुसार, विकसित कृषी अभियानाच्या प्रारंभाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. या वेळी राज्याचे कृषिमंत्री म्हणून आपण शेती कामाचा समावेश रोजगार हमीत करावा, असा मुद्दा त्यांच्यासमोर रेटला.

Jowar Farming
Maize Jowar Rate: अमेरिकेची ज्वारी भारताच्या मक्यापेक्षा स्वस्त; आयात खुली करण्याची अमेरिकेची मागणी

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची ही मागणी आहे. परंतु केंद्रस्तरावर ती मांडल्या गेली नाही. पहिल्यांदाच आपण ती मांडली. याबद्दल जावंधिया यांनी श्री. कोकाटे यांचे अभिनंदन केले आहे. शेतमजुरीवर होणारा ३० ते ५० टक्‍के खर्च रोजगार हमीतून दिला जावा, हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचा यामुळे उत्पादकता खर्च कमी होईल.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा प्राधान्याने याकरिता विचार होण्याची गरज आहे. विदर्भ, मराठवाड्यात अन्नधान्यासोबतच चाऱ्याकरिता पूर्वी ज्वारीची लागवड होत होती. पुढे हे पीक अनेक अडचणींमुळे बाद झाले. विदर्भात तर ४० टक्‍के खरीप ज्वारीचा पेरा होता. आज पाच टक्‍के ज्वारी पेरली जात नाही. याची सर्वाधिक झळ कोरडवाहू शेतीला बसत आहे. चारा नाही म्हणून पशुपालन देखील मागे पडले.

Jowar Farming
Jowar Farmer Story: पिवळी ज्वारी आणि शेतकरी राजा

त्यामुळे शेणखत देखील नाही आणि त्यातून जमिनीचा पोतही खालावला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे ३० जून २००६ मध्ये विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे ज्वारीला एकरी अनुदानाची मागणी करण्यात आली होती. एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत ज्वारी लागवडीसाठी पेरणी ते कापणीचा समावेश रोजगार हमीत व्हावा, अशी भूमिका मांडली होती.

या वेळी चर्चेत सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले होते. त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आली असून आपल्या या निर्णयामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास एक क्रांतिकारी पर्व राज्याच्या शेतीसाठी ठरेल, असा विश्‍वासही जावंधिया यांनी व्यक्‍त केला आहे.

केंद्राच्या परवानगीची गरज नाही

महाराष्ट्राकडे रोजगार हमी योजनेचा स्वतंत्र निधी आहे. त्यामुळे ज्वारी पिकासाठी ‘पेरणी ते कापणी’ या बाबीचा समावेश रोजगार हमीत केल्यास त्याकरिता केंद्राच्या परवानगीची गरज राहणार नाही, असेही जावंधिया यांनी पत्रात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com