Washim APMC: वाशीम येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले. शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.