Water Conservation : जल संवर्धनाचा शास्त्रीय अभ्यास करताना...

Water Storage : दरवर्षी १६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

प्रताप चिपळूणकर

Moisture Conservation : दरवर्षी १६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या अंतर्गत यंदा ‘पाणी हे जीवन, पाणी हेच अन्न' हे घोष वाक्य आहे. एकूण पृथ्वीतलावरील पाण्याने व्यापलेले क्षेत्र, एकूण पाण्याच्या पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राणीसृष्टीसाठी फक्त २.५ टक्के पाणी वापरण्यायोग्य आहे.

मी गेले ५३ वर्षे महाराष्ट्रातील सर्वात पाणीदार जिल्हा कोल्हापूर येथे शेती करीत आहे. १९७२ चे दुष्काळात महाराष्ट्रात फक्त आमच्या नदीवरील धरण पूर्ण भरले होते. हे लिहिण्याचे कारण अवर्षण अगर पाण्याचे दुर्भिक्ष या विषयाला आम्हाला फारसे कधी सामोरे जावे लागले नाही.

तरीही २० ते २५ वर्षे शेतीत गेल्यानंतर कमी उत्पादकतेचे प्रश्नाला तोंड देणे वाट्याला आल्यानंतर शेती विषयक अनेक प्रश्नांचा तळापर्यंत जाऊन अभ्यास केला यात पाणी हा एक अभ्यासाचा प्रमुख विषय होता.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात १८ टक्के बागायती तर ८२ टक्के कोरडवाहू शेती आहे. शेतीमध्ये काम करीत असता विना नांगरणीची शेती या विषयाकडे अपघाताने वळलो. या विषयाची प्रथम गोड फळे बागायतीमध्ये चाखली.

परंतु ८२ टक्के कोरडवाहू शेतीला या तंत्राचा कसा फायदा करून देता येईल यावर चिंतन सुरू झाले. वेगवेगळ्या मार्गांचा (प्राचीन व सुधारित) अभ्यास करीत असता जमिनीची सुपीकता हा विषय फुकटात सोडविण्याचे तंत्र विकसित झाले.

पुढे पाणी हा प्रश्नही फुकटात सोडविण्याच्या शक्यतेचा अभ्यास सुरू झाला. यातून बरेच नवीन विषय ज्ञात झाले, होत आहेत. त्याची माहिती कोरडवाहू बरोबर बागायती सुविधा उत्तम असणाऱ्या शेतकऱ्यांनीही अभ्यासणे गरजेचे वाटते.

एक सर्वसाधारण मानसिकता अशी आहे की, पाण्याची सुबत्ता जितकी जास्त तितका त्याचा गैरवापर जास्त. पाण्याचा कार्यक्षम वापर म्हणजे ठिबक अगर तुषार सिंचन, या दोनही पद्धतीसाठी मोठा प्राथमिक खर्च करावा लागतो.

Water Conservation
Cow Conservation : गोमातेच्या शास्त्रीय संवर्धनाचा घेऊ वसा

इस्राईल देशात हे तंत्र विकसित झाले कारण त्यांना प्रचंड पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. तितकी वाईट परिस्थिती आपल्याकडे नाही. त्यामुळे एकूण बागायतीपैकी किती टक्के क्षेत्रावर ठिबक संचाचा वापर केला जातो. असा अभ्यास केल्यास फळबाग तथा मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करणाऱ्या पिकात याचा वापर जास्त आहे. त्यामानाने इतर पिकात खूप कमी आहे.

आपल्याकडे आपण पाट पाण्याचा कार्यक्षम वापरावर जास्त संशोधन करणे गरजेचे आहे. परंतु या विषयावर फारसे प्रबोधन केले जात नाही. पाट पाण्यातही आपण कार्यक्षम वापरू करू शकतो.

हा मुद्दा पुढे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. फक्त पावसाच्या पाण्यावर येणारी कोरडवाहू शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर असा काही प्रकार असतो का? या प्रश्नाचे उत्तर यात फारसा काम करण्यास वाव नाही, असे येईल.

Water Conservation
Water Conservation : ‘तहान’ शब्द जल व्यवस्थापनाशी कसा जोडलेला आहे?

माझा अभ्यास असे सांगतो की, या विषयात काम करण्यास भरपूर वाव आहे. असे काम करीत असता शक्यतो शेतकऱ्यावर अगर सरकारवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये. असे असेल तरच सामान्य शेतकरीही या तंत्राचा लाभ घेऊ शकतील. कोरडवाहू शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर याचा आपण अभ्यास करणार आहोत.

भूगर्भावरून वाहणारे पाणी साठविणे आणि गरजेप्रमाणे वापरणे तसेच पडणारे पाणी जमिनीत जिरवणे हे दोन स्वतंत्र वेगवेगळे विषय आहेत. आज वाहते पाणी अडवून साठविणे आणि पुढे गरजेप्रमाणे वापरणे यावर जितके काम होते, त्यामानाने जमिनीत पाणी मुरवणे यावर फारशी चर्चा होत नाही. यावर काही नवीन संदर्भ या लेखमालेच्या माध्यमातून मांडणार आहे.

पावसाळ्यात डोंगरात पाणी मुरते. त्यातील अतिरिक्त पाणी तळातील ओढ्यानाल्यातून पुढे वाहते. गुरुत्वाकर्षणाने बाहेर पडणारे पाणी पावसाळ्यानंतर काही काळ वाहील. परंतु काही ठिकाणी नद्या बारमाही वाहतात. हे नदीत बारमाही पाणी कसे प्रकट होते? या मार्गात थोडा शास्रीय दृष्टिकोन तसेच भू-जल संवर्धनाचा अभ्यास आता महत्त्वाचा आहे.
----------------------
संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८
( लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com