Flood Situation : रत्नागिरीत तीन तालुक्यांतील १५९ शेतकऱ्यांना पुराचा फटका

Heavy Rain Update : मागील दोन दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यात पावसाचा जोर मंगळवारी (ता. ९) कमी झाला आहे. त्यामुळे दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुरमधील नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे.
Flood
FloodAgrowon

Ratnagiri News : मागील दोन दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यात पावसाचा जोर मंगळवारी (ता. ९) कमी झाला आहे. त्यामुळे दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुरमधील नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. मात्र पुरामुळे नदीकिनारी भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पुनर्लागवड केलेली भात रोपे वाहून गेली आहेत. संगमेश्वर, दापोली, चिपळूण या तीन तालुक्यांतील २१ गावांतील १५९ शेतकऱ्यांना पुराच फटका बसला.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ७१.९८ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगडमध्ये ६८.४० मिमी, दापोली ११८.९०, खेड ८१.४०, गुहागर १४६, चिपळूण ३८, संगमेश्‍वर २१.६०, रत्नागिरी ८३, लांजा ५५.१०, राजापूरमध्ये ३५.४० मिमी पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १३०१ मिमी पाऊस झाला आहे.

Flood
Kolhapur Sangli Flood : धास्ती महापुराची! पंचगंगेच्या रुंदीकरण, खोलीकरणासाठी ८४० कोटींचा निधी

दापोली तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी भरले होते. मात्र मंगळवारी पावसाचा जोर ओसरला. पावसामुळे १५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून करंजाणी, आघारी, आवाशी, उन्हवरे आदी गावातील घरांची मोठी पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

आंजर्ले खाडीतील मच्छीमारांनी नौका खाडीतील पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्यामुळे नौकेचे नुकसान झाले आहे. चिपळुणातील वाशिष्ठी नदी, राजापुरातील अर्जुना नदीचा पूर मंगळवारी ओसरला आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील पुराचे पाणी ओसरले. बाजारपेठेसह हातीस येथील दर्ग्यात पुराचे पाणी शिरले होते.

Flood
Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीरच

त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्याला पावसाने झोडपले असून शृंगारतळीसह परिसरातील अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. बाजारपेठेमध्ये एक फुटापर्यंत पाणी होते. महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती. लांजा भांबेड येथील भाई जोशी यांच्या घर परिसरात दिवसभर पाणी साचले होते. भांबेड बाजारपेठ येथील शंकर गांधी यांच्या दुकानात गटाराचे पाणी व चिखल जाऊन नुकसान झाले.

मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथे महामार्गाची साईडपट्टी खचली आहे. गुहागर तालुक्याला पावसाचा तडाखा बसला. घरे, गोठ्यांसह, दुकानामध्ये पावसाचे पाणी भरल्यामुळे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. चिपळूण, संगमेश्वर, दापोली या तीन तालुक्यांतील २१ गावांतील भातशेती वाहून गेल्यामुळे नुकसान झाले. १५९ शेतकऱ्यांचे १४.२७ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com