POCRA Scheme : ‘पोकरा’मध्ये २१ जिल्ह्यांतील ६९५९ गावांचा नव्याने समावेश

POCRA Project : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)चा दुसरा टप्पा निश्चित केला असून, यात नव्याने २१ जिल्ह्यांतील ६९५९ गावांची निवड केली आहे.
POCRA
POCRAAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)चा दुसरा टप्पा निश्चित केला असून, यात नव्याने २१ जिल्ह्यांतील ६९५९ गावांची निवड केली आहे. त्यासाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने सहा हजार कोटी रुपयांच्या योजना राबविण्याला शासनाची तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

शेती आणि शेतीशी निगडीत बाबींच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजना जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ही योजना यशस्वी झाल्याने नव्याने या योजनेत जिल्ह्याचा आणि गावांचा समावेश करण्याची मागणी होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मान्यतेने या प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमधील ६९५९ गावांचा समावेश केला आहे.

POCRA
POCRA 2.0 : पोखरा दोनमध्ये नांदेडमधील ३७५ गावांची निवड

या गावांत विविध योजना राबवण्यासाठी अंदाजित ६००० कोटी (रुपये सहा हजार कोटी) किमतीच्या जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यास शासनाने तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती असेल.

POCRA
POCRA Project : ‘पोकरा’ प्रकल्पाचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती

त्यात नियोजन विभाग, वित्त विभाग, सहकार व पणन विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग, जलसंधारण विभागाचे सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्त, चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू हे सदस्य असून पोकराचे प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प निमंत्रित सदस्य असतील. कर्बग्रहण वाढवून शेतकन्यांना कार्बन क्रेडिट सुविधा उपलब्ध करण्यास साहाय्य करणे, संवर्धित व पुनरुज्जीवित या हवामान शेती पद्धतीचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढविणे, पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे, हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विविध संशोधन संस्थांबरोबर भागीदारी करणे इत्यादी घटकांचा समावेश राहील, असे नमूद केले आहे.

जिल्हानिहाय समावेश केलेली गावे

अकोला : १४९, अमरावती : ४५४, बीड : ३०१, : भंडारा : २९१, बुलडाणा : ३१० चंद्रपूर : ५६१, छत्रपती संभाजीनगर : २९६, धाराशिव : १३८, गडचिरोली : ५३२, गोंदिया :;२९३, हिंगोली : १४८, जळगाव : ३१९, जालना : १७७, लातूर : २१६, नागपूर : ५६३, नांदेड : ३७५, नाशिक : ५३२, परभणी : १७३, वर्धा : ३८३, वाशीम : १८९, यवतमाळ : ५५९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com