Turmeric Market : राजापुरी हळदीची उलाढाल २५८ कोटींनी वाढली

Turmeric Rate : २०२३-२४ या आर्थिक वर्षात हळदीची उलाढाल १४८९ कोटी ८६ लाख ३८ हजार ४२५ झाली. २०२२-२३ च्या तुलनेत राजापुरी (स्थानिक) हळदीची उलाढाल २५८ कोटी ५१ लाख ५५ हजार ३५८ रुपयांनी वाढली.
Turmeric
Turmeric Agrowon

Sangli News : गेल्या तीन वर्षांत हळदीचे दर दबावत होते. गेल्या वर्षी पावसाची कमतरता आणि पाण्याची टंचाई याचा फटका हळद पिकाला बसल्याने उत्पादन घटले आहे. यामुळे हळदीला दराची झळाळी मिळाली असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात हळदीची उलाढाल १४८९ कोटी ८६ लाख ३८ हजार ४२५ झाली. २०२२-२३ च्या तुलनेत राजापुरी (स्थानिक) हळदीची उलाढाल २५८ कोटी ५१ लाख ५५ हजार ३५८ रुपयांनी वाढली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेत स्थानिक, हळदीबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक, यासह अन्य राज्यांतून हळद विक्रीसाठी शेतकरी येतात. २०२२-२३ मध्ये १२३१ कोटी ३४ लाख ८३ हजार ६७ रुपयांची उलाढाल झाली होती. गेल्या दोन ते तीन वर्षांत हळदीला अपेक्षित दर नसल्याने हळदीची उलाढाल कमी झाल्याचे चित्र आहे.

Turmeric
Turmeric Cultivation : नियोजन हळद लागवडीचे...

कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता याचा फटका हळद लागवडीला बसला आणि उत्पादन घटले. नवीन हळदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हळदीला सरासरी ८५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. बाजारात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवी हळद सौद्यांना येऊ लागली.

नव्या हंगामाच्या प्रारंभापासून हळदीला चांगले दर मिळू लागले. प्रतवारीनुसार १३ हजारांपासून १७ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. अवघ्या दीड ते पावणे दोन महिन्यांतच हळदीला चांगले दर मिळाल्याने बाजार समितीत उलाढाल वाढली.

बाजारात स्थानिक हळदीची आवक जास्त असते. २०२२-२३ या वर्षात स्थानिक (राजापुरी) हळदीची १४ लाख ४७ हजार १३९ क्विंटल आवक झाली. तर २०२३-२४ मध्ये २२ लाख ६१ हजार ३२५ क्विंटल आवक झाली. गतवर्षी कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे उत्पादन घटले.

परिणामी आवक घटली. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ३ लाख १२ हजार ८१४ क्विंटलने आवक कमी झाली. बाजार समितीत परपेठ म्हणजे इतर राज्यांतील हळद आवकही कमी झाली. या हळदीची उलाढाल १३५ कोटी ५५ लाखांनी वाढली आहे.

Turmeric
Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

बाजार समितीत हळदीची उलाढाल

राजापुरी हळद

वर्ष उलाढाल

२०२२-२३ १२३१ कोटी ३४ लाख

२०२३-२४ १४८९ कोटी ८६ लाख

परपेठ हळद

वर्ष उलाढाल

२०२२-२३ १३६ कोटी २० लाख

२०२३-२४ २७१ कोटी ७५ लाख

सांगली बाजार समितीची विश्‍वासार्हता आहे. त्यामुळे शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. गतवर्षी हळदीचे उत्पादन कमी असल्याने दर चांगले असल्याने यामुळे हळदीची उलाढाल वाढली आहे.
सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com