Citrus Estate Work : सिट्रस इस्टेटची कामे दर्जेदार करा : घाटगे

Divisional Agriculture Joint Director Umesh Ghatge : प्रकल्पाशी संबंधित कामांचा दर्जा राखत सर्वोत्तम सेवा शेतकऱ्यांना कशा देता येतील, यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले.
Divisional Agriculture Joint Director Umesh Ghatge
Divisional Agriculture Joint Director Umesh GhatgeAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : संत्रा उत्पादकांना लागवड ते काढणी आणि त्याही पुढे जात मार्केटिंगच्या टप्प्यावर मार्गदर्शन करण्यात सिट्रस इस्टेटचे योगदान राहणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाशी संबंधित कामांचा दर्जा राखत सर्वोत्तम सेवा शेतकऱ्यांना कशा देता येतील, यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले.

ढिवरवाडी (ता. काटोल) येथे प्रस्तावित सिट्रस इस्टेटच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, सिट्रस इस्टेटचे अध्यक्ष तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम भवरी,

Divisional Agriculture Joint Director Umesh Ghatge
Development Work : आचारसंहितेपूर्वी विकासकामे तत्काळ पूर्ण करा

उपविभागीय कृषी अधिकारी योगराज जुमडे, तालुका कृषी अधिकारी कुणाल ठाकूर, कृषी पर्यवेक्षक वामन ठाकरे, सिट्रस इस्टेटचे कर्मचारी उपस्थित होते. श्री. घाटगे म्हणाले, की संत्रा बागायतदारांना दर्जेदार रोपांचा पुरवठा, त्यानंतर शिफारसीत लागवड तंत्रज्ञान व इतर बाबींवर सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून मार्गदर्शनावर भर दिला जाणार आहे.

Divisional Agriculture Joint Director Umesh Ghatge
Citrus Estate : लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचा सिट्रस इस्टेटला खोडा

त्यामुळे ही कामे दर्जेदार कशी होतील, यावर भर दिला पाहिजे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, मातृवृक्ष लागवड, शेडनेट उभारणी, ठिबक सिंचन सुविधा, गुणवत्तापूर्ण कलमांचे उत्पादन, प्रशासकीय इमारत बांधकाम, कलेक्‍शन, ग्रेडिंग, कोटिंग, पॅकेजिंग युनिट उभारणी, अवजारे बॅंक सुविधा अशा विविध कामांचा त्यामध्ये समावेश आहे.

अवजार बॅंकेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांन कसा होईल, यावरही लक्ष केंद्रित करून या संबंधी प्रचारावर भर दिला पहिजे. त्याबरोबरच कृषी निविष्ठा केंद्र, सभासद नोंदणी, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक या बाबीदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com