Food Labeling Standards : लेबलिंग मानकांचे महत्त्व

Food Processing Industry : अन्न प्रक्रिया क्षेत्रात विशेषतः अन्न पदार्थांच्या वापर पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहे. त्याच बरोबरीने आहार संबंधित समस्या गेल्या काही वर्षांपासून तीव्रतेने वाढल्या आहेत.
Food Label
Food LabelAgrowon

आशिष तोडकर, श्रुती पाटील

Food Labeling Regulation : अन्न प्रक्रिया क्षेत्रात विशेषतः अन्न पदार्थांच्या वापर पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहे. त्याच बरोबरीने आहार संबंधित समस्या गेल्या काही वर्षांपासून तीव्रतेने वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना अन्न उत्पादन आणि गुणवत्तेची माहिती असणे आवश्यक आहे.

अन्न उत्पादनावरील लेबल ग्राहकांना उत्पादन, त्यातील घटक आणि अन्नामध्ये पोषक तत्त्वांची माहिती देण्यासाठी महत्त्वाचे आहे.

पदार्थांच्या पॅकिंगवर असणारे लेबल उत्पादनाची मूलभूत माहिती देते. यामध्ये सामान्य नाव, घटकांची यादी, निव्वळ प्रमाण, टिकवण क्षमता, गुणवत्ता, अन्न शाकाहारी किंवा मांसाहारी असेल तर त्याचा लोगो, मूळ उत्पादनाचा देश, अन्न उत्पादन उद्योगाचा नाव, पत्ता आणि अन्न मानक एजन्सीकडून घेतलेला अन्न परवाना अंक प्रकाशित करणे आवश्यक आहे.

लेबलमध्ये पोषण माहिती, सुरक्षित साठवण, हाताळणी व तसेच पोषक घटक चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे आणि खनिजे नमूद केले पाहिजे. अन्न प्रक्रिया करताना वापरलेले रंग, संरक्षक घटक-I संरक्षक घटक-II आणि नमूद केलेल्या आकाराच्या अन्नाची मात्रा या बाबीचा उल्लेख ‘एफएसएसएआय’नुसार अन्न पदार्थाच्या लेबलमध्ये असावा.

Food Label
Pesticide Label : कीटकनाशकाचे लेबल आता हिंदी-इंग्रजी भाषेतच!

नियमितपणे अन्न लेबल न वाचण्याची कारणे

व्यस्त दैनंदिनी आणि खरेदी करताना घाई करणारे ग्राहक खाद्य पदार्थांवरील माहिती वाचत नाहीत.

काही ग्राहक कुप्रसिद्ध ब्रँडवर विश्‍वास ठेवतात, वारंवार खरेदी करतात. खरेदी केलेली उत्पादने सुरक्षित आहेत हे गृहित धरतात.

अन्न पॅकेजचा आकर्षकपणा ग्राहकांना खरेदी निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात. पॅकेजवरील पौष्टिक तत्त्वाची माहिती न वाचता केवळ पॅकेजिंगवर आकर्षित होऊन उत्पादन खरेदी करतात.

भाषेतील अडथळे, गुंतागुंतीची भाषा असल्याने ग्राहक लेबल वाचत नाहीत.

अन्न सुरक्षा आणि मानके नियम, २०११ नुसार महत्त्वाच्या बाबी

एफएसएसएआय लोगो(FSSAI), परवाना क्रमांकामुळे सदरील उत्पादन सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे पालन होते. उत्पादनाची आवश्यक चाचणी झाली आहे आणि ‘एफएसएसएआय'ने दिलेल्या नियमांचे पालन केले आहे, याबाबत ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यास मदत होते. चौदा अंकी परवाना क्रमांक हा फूड पॅकेजच्या मागील लेबलवर छापणे आवश्यक आहे.

शाकाहारी / मांसाहारी ः खाद्यपदार्थांवर अनेकदा शाकाहारी किंवा मांसाहारी असे लेबल लावले जाते. एफएसएसएआयच्या नियमानुसार शाकाहारी अन्नाच्या चौकोनात हिरवा बिंदू आणि मासांहारी खाद्यपदार्थांच्या चौकोनात तपकिरी त्रिकोण दाखवणे आवश्यक आहे. हे लेबलिंग ग्राहकांना अन्न प्रकार सहज ओळखण्यास मदत होते.

Food Label
Food distribution system : अन्नधान्याची सार्वजनिक वितरण प्रणाली

पौष्टिक घटकांची माहिती :कॅलरी, चरबी, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण देणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आहाराबद्दल दिलेली माहिती समजण्यास मदत होते.

‘एफएसएसएआय’च्या नियमानुसार पौष्टिक माहिती लेबलवर देणे आवश्यक आहे. यामध्ये ऊर्जा, प्रथिने, कर्बोदके, चरबी, ट्रान्स फॅट, साखर आदी माहिती देणे आवश्यक आहे. '

स्वरूप आणि सादरीकरण : पॅकेटवर पौष्टिक माहिती विशिष्ट स्वरूपात सादर करावी लागते. यामध्ये नमूद केलेल्या मापदंडकांचा समावेश असावा.हे ग्राहकांना वाचणे आणि समजणे सोपे असावे.

शिफारस केलेल्या आहाराची टक्केवारी : ‘एफएसएसएआय'ने शिफारस केलेला आहाराची टक्केवारीची (RDA) माहिती समाविष्ट करणे बंधनकारक आहे.

ॲलर्जीची माहिती : उत्पादनामध्ये डेअरी (दुग्धशर्करा), सोया, ग्लूटेन इत्यादी सारख्या सामान्य ऍलर्जी असणाऱ्या घटकांचा समावेश असल्यास नोंद करावी. हा उल्लेख ग्राहकांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

‘एफएसएसएआय'च्या आदेशानुसार खाद्य व्यावसायिकांनी प्री-पॅकेज केलेल्या खाद्य पदार्थामध्ये सामान्य ॲलर्जीची नोंद घोषित करणे आवश्यक आहे.

तारीख : पॅकेज लेबलिंगमध्ये पदार्थ वापरण्याची मर्यादा तारीख प्रकाशित करणे अनिवार्य आहे. ग्राहकांना उत्पाद‌नाची साठवण क्षमता आणि वापरावयाच्या कालावधीबद्दल माहिती मिळते. Best before date हे सहसा नाश न होणाऱ्या वस्तूंना

लागू होते. योग्यरीत्या साठवून ठेवल्यास पदार्थ चांगल्या गुणवत्तेमध्ये राहातात.

Use by date अन्न उत्पादन वापर करण्याची शेवटची तारीख दर्शवते, यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, मांस, नाशिवंत वस्तूवर अधिक सामान्य आहे.

Date of Mfg./ Packaging उत्पादन केव्हा तयार केले गेले आहे किंवा पॅकेज कधी केले आहे हे दर्शवते.

अन्न पदार्थ कसे साठवून ठेवावेत याची माहिती महत्त्वाची आहे.

सेंद्रिय प्रमाणपत्र : काही अन्न उत्पादनावर सदरील अन्न हे सेंद्रिय उत्पादन असल्याचे दर्शविणारे लेबल असावे.

अन्न उत्पादनाचे ठिकाण हे ग्राहकांना हे माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भारतात अन्न उत्पादन होणाऱ्या अन्न पदार्थाच्या लेबलवर ‘Made In India’ प्रकाशित करण्यात यावे.

आकारमान : घन आणि द्रव पदार्थाचे आकारमान नोंदविलेले असावे.

आशिष तोडकर, ९८५०६०७०५१

(अन्न आणि दुग्ध तंत्रज्ञान विभाग, पारुल विद्यापीठ, वडोदरा, गुजरात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com