Governance in Agriculture : चार जिल्ह्यांत कृषी क्षेत्रात सुशासन

Agricultural Management : जिल्हा सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार कृषी क्षेत्रात पहिले पाच जिल्ह्यांत अमरावती, वाशीम, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : जिल्हा सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार कृषी क्षेत्रात पहिले पाच जिल्ह्यांत अमरावती, वाशीम, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथिगृहात गुरुवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांकाचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या सहकार्याने जिल्हा सुशासन निर्देशांक हा विविध क्षेत्रांच्या मापदंडानुसार सुशासनाची व्याप्ती दर्शवीत आहे. अतिशय विस्तृत अशाप्रकारचा हा निर्देशांक आहे. मागील काळात शासनाने लोककेंद्रित प्रशासनावर भर देत नागरिकांना तक्रारी सोडविण्यासाठी आपले सरकार नावाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.

Agriculture
Government Power : सरकारच्या हाती कोलीत

जिल्हा सुशासन निर्देशांक ही पद्धत केवळ रॅकिंग दाखविणारी नाही, तर सुधारणा करण्यास वाव देणारी आहे. राज्यात जास्तीत जास्त गुण मिळणारे जिल्हे आणि कमीत कमी गुण मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गुणांचा फरक कमी आहे. त्यामुळे सर्वच जिल्हे प्रगती करताना दिसत आहे. जिल्हा सुशासन निर्देशांक हा १० विकास क्षेत्रातील १६१ मापदंडांवर आधारित असून ज्या जिल्ह्यांची कामगिरी गुणवत्तेच्या आधारे कमी दिसते.

त्या जिल्ह्यांनी कामगिरी सुधारत निर्देशांकात प्रगती करावी. यामध्ये पालक सचिवांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही दिल्या. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक कृष्णा फिरके, सहसंचालक सविता दीक्षित आदी उपस्थित होते.

Agriculture
Agricultural Development : नवतंत्रज्ञान, पीक वाण प्रसारातून ‘पंदेकृवि’ उभारतेय ‘मॉडेल व्हिलेज’!

जिल्हा सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार पहिले पाच जिल्हे

कृषी व संबंधित क्षेत्र अमरावती, वाशीम, छ. संभाजीनगर, लातूर, परभणी.

वाणिज्य व उद्योग मुंबई शहर, रायगड, पुणे, पालघर, ठाणे.

मनुष्यबळ विकास नाशिक, गोंदीया, पुणे, यवतमाळ, सातारा.

सार्वजनिक आरोग्य सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, पालघर, बीड, रत्नागिरी.

पायाभूत सोयी - सुविधा लातूर, नाशिक, बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली.

सामाजिक विकास गोंदीया, अमरावती, नाशिक, धुळे, नागपूर.

आर्थिक सुशासन मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, जळगांव, भंडारा.

न्यायप्रणाली व सुरक्षा मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, गडचिरोली, रायगड.

पर्यावरण सांगली, छ. संभाजीनगर, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर.

लोककेंद्रीत प्रशासन नाशिक, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com