Brazil Sugar Export : ब्राझीलची साखर निर्यात २८ टक्क्‍यांनी वाढली

Sugar Export News : जागतिक बाजारपेठेत यंदा निर्विवाद वर्चस्वाकडे वाटचाल
Sugar Export
Sugar ExportAgrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Market Rate : कोल्हापूर ः यंदाच्या हंगामात जगामध्ये ब्राझीलच्या साखरेचा दबदबा राहणार हे स्पष्‍ट होत आहे. साखर निर्यातीत ऑक्टोबरच्‍या तुलनेत नोव्‍हेंबरमध्ये २८ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात साखरेची निर्यात ३० लाख टनापर्यंत जाऊन पोहोचली. ऑक्टोबर २०२२ नंतर झालेली ही आतापर्यंतची सर्वीधिक निर्यात झाली आहे. अजूनही निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

इतर देशातील घटत्या उत्पादनामुळे ब्राझील मोठा लाभ मिळणार असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के उत्‍पादन वाढण्याची शक्‍यता आहे. ब्राझीलच्या सरकारी एजन्सी कोनॅबने दिलेल्या माहितीनुसार, अनुकूल हवामानामुळे उसाचे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे.

परिणामी, जगातील आघाडीचा साखर निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या साखर उत्पादनात २७.४ टक्के वाढ होऊन ४६० लाख टनांचा ऐतिहासिक उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

सध्या भारतासारख्या देशांमध्ये साखर उत्पादनावरून साखर उद्योग व केंद्र सरकार यांच्यात घमासान सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी साखर निर्यातीत एक नंबरवर असलेल्या भारताची यंदा जगाच्या बाजारपेठेत एकदम केविलवाणी अवस्था झाली आहे. एकदम उच्‍चांकी निर्यातीनंतर ते निर्यात बंद असा दोन वर्षांचा प्रवास भारताचा झाला आहे.

यंदा जगाच्या बाजारपेठेत भारताची साखर येणार नाही हे निश्चित झाले आहे. भारताची सर्व धोरणे ब्राझीलच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. २०२१-२२ ला १०० लाखांहून अधिक तर २०२२-२३ मध्ये ६० लाख टन साखर निर्यात झाली. भारताजवळील देशांना या निर्यातीचा मोठा फायदा झाला.

Sugar Export
Sugar Export: भारताची साखर निर्यात कमी होत जाणार; साखरेचे भाव वाढण्याचा अंदाज

श्रीलंका, अफगाणिस्‍तान यांसारख्या देशात अनेक खरेदीदार मिळाल्याने भारतीय साखरेचा दबदबा झाला, परंतु भारत सरकारच्‍या धोरणाने ब्राझीलला यंदा आयतेच कुरण मिळाले आहे. ब्राझीलपासून गेल्या दोन वर्षांत दुरावलेल्या देशांना यंदा केवळ ब्राझीलकडे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. याचा फायदा ब्राझील घेत असल्‍याचे दिसत आहे.

तेथील बंदरावर साखर वाहतुकीसाठी जहाजे मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या जागतिक बाजारात साखर दरात तेजी-मंदी सुरू आहे. यामुळे जेवढी साखर चांगल्‍या दराने बाहेर जाईल तितकी साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न ब्राझीलचा साखर उद्योग करत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com