Crop Survey : ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा’

Aditya Thackeray : निर्दयी सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आम्ही सरकारकडे आग्रही भूमिका मांडू.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : निर्दयी सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आम्ही सरकारकडे आग्रही भूमिका मांडू.

सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तरी सकारत्मकता दाखवावी, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (ता. ४) पाचोड (ता.पैठण) येथे नुकसानग्रस्त शेताच्या पाहणी प्रसंगी केले.

Crop Damage
Crop Damage Survey : मिरज, पलूस, शिराळ्यातील पिकांचे पंचनामे कधी?

सलग दोन दिवस संततधार झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांची पाहणी करण्यासाठी सेना नेते आदित्य ठाकरे हे बुधवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सर्वप्रथम पाचोड येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

Crop Damage
Crop Damage Survey : अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बाबाजानी दुर्राणी आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे म्हणाले, की हे सरकार निर्दयी आहे, ते केवळ घोषणा करते, मदत करत नाही. सरकारने शेतकऱ्यांचे दुःख बांधावर जाऊन पहावे, दोन वर्षापूर्वीचे अनुदान दिलेले नाही. यावरून त्यांच्या निष्क्रियतेची कल्पना येते. सरकारमधून बाहेर पडून स्थापित झालेल्या गद्दार सरकारला शेतकऱ्याना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही धारेवर धरू.

अद्याप एकही गद्दार सरकारमधील मंत्र्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली नाही. मात्र आम्ही मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार हे समजताच ते उद्यापासून दौरे सुरू करणार, असल्याचे ते म्हणाले. यावेळी पैठण उबाठा गटाचे विधानसभा ॲड. बद्रीनारायण भुमरे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, तहसीलदार सारंग चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, मंडळ कृषी अधिकारी सुहास धस, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, तलाठी अनुना कावळे, राजू शेठी, धनराज भुमरे, अनिस पटेल, शेतकरी, ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com