Vice President : आयएमडीचे अचूक अंदाज शेतकऱ्यांसह जवानांसाठी ठरताहेत उपयुक्त : उपराष्ट्रपती

Jagdeep Dhankharad : उपराष्ट्रपती जगदीप धनखरड यांनी सोमवारी (ता. १५) भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) कौतुक केले.
Vice President Jagdeep Dhankharad
Vice President Jagdeep DhankharadAgrowon
Published on
Updated on

New Delhi : भारतीय हवामानशास्त्र विभागाने चक्रीवादळ यांसारख्या हवामानाच्या घटनांचा वेळेवर अंदाज जारी केल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांचे जीव वाचविण्यात मदत झाली आणि जहाजांचे नुकसान टळले, अशा शब्दात उपराष्ट्रपती जगदीप धनखरड यांनी सोमवारी (ता. १५) भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) कौतुक केले.

आयएमडीच्या १५० व्या वर्धापन दिन समारंभाचा प्रारंभ धनखड यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी आयएमडीच्या ‘मौसम’ या मोबाइल अॅपचे तसेच पंचायत मौसम सेवा, निर्णय समर्थन प्रणाली आणि हवामान सेवांसाठी राष्ट्रीय फ्रेमवर्क या नवीन उपक्रमांचे अनावरण केले.

हे ॲप हवामान कार्यालयाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सर्व सेवा एकत्रित करते. या समारंभाला विज्ञान मंत्री किरेन रिजिजू, विज्ञान सचिव एम रविचंद्रन, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि माजी महासंचालक उपस्थित होते.

Vice President Jagdeep Dhankharad
Loan Interest Waive : आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी

जगदीप धनखड म्हणाले, की एक काळ असा होता जेव्हा हवामान कार्यालयाने दिलेले पावसाचे अंदाज वैज्ञानिक प्रगतीच्या अभावामुळे चुकीचे ठरले होते, परंतु आता अंदाज तंतोतंत येत आहेत.

आयएमडीचा प्रभाव अधिक आहे. केवळ हवामान अंदाजापेक्षाही राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करून आणि नागरिकांना निसर्गाच्या कोपापासून संरक्षण देणारे सुरक्षा जाळे निर्माण झाले आहे.

Vice President Jagdeep Dhankharad
Farmers Subsidy : पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार? मंत्रालयात बैठकीचे आयोजन

शेती आणि आरोग्यसेवेपासून ते विमान वाहतूक आणि उर्जेपर्यंत, त्याचा प्रभाव सर्वव्यापी आहे. शेतकऱ्यांपासून ते आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला ते स्पर्श करते. ते म्हणाले, की खंडित आपत्ती व्यवस्थापनाचे दिवस आता राहिले नाहीत.

एक काळ असा होता की जेव्हा आयएमडी पावसाचे भाकीत करत असे आणि पाऊस पडत नसे, आता सेकंदांनुसार अचूकता आहे. याबद्दल आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा निश्‍चितच अभिमान आहे.

त्या दिवसाची वाट पाहतोय

राज्यसभेचे अध्यक्ष असलेले जगदीप धनखड म्हणाले, की ज्या दिवशी आयएमडी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज लाऊ शकेल, त्या दिवसाची मी वाट पाहत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com