Illegal Seed Storage : मुस्तीत उडदाच्या बियाणाची बेकायदा साठवणूक, विक्री

Agriculture Inputs Sale : विशेष म्हणजे कंपनीच्या प्रतिनिधीकडूनच या उडादाची चढ्या दराने विक्री केली जाताना, बाजारात मात्र उडदाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा प्रकार यामध्ये उघड झाला आहे.
Agriculture Seeds
Agriculture SeedsAgrowon
Published on
Updated on

Solapur News : कृषी विभागाच्या भरारी पथकाने मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील एका शेतात धाड टाकत उडदाच्या पायाभूत बियाणाची बेकायदा साठवणूक करुन त्याची थेट शेतकऱ्यांना विक्री करत असल्याच्या कारणावरून पाचोरा (जि. जळगाव) येथील निर्मल सीड्‍स कंपनीसह चार जणांविरुद्ध वळसंग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे कंपनीच्या प्रतिनिधीकडूनच या उडादाची चढ्या दराने विक्री केली जाताना, बाजारात मात्र उडदाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा प्रकार यामध्ये उघड झाला आहे.

नागनाथ शरणप्पा भीमशेट्टी (रा. मुस्ती), संजयकुमार बलगिरी गुणवाड (रा. लवंगी, ता. मंगळवेढा) आणि निर्मल सीड्‍स कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ शरणप्पा भीमशेट्टी (रा. मुस्ती) यांच्यासह निर्मल सीडस कंपनीवर पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश काटे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Agriculture Seeds
Illegal HTBT Seed : अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा मूर्तिजापूरमध्ये जप्त

बाजारात सध्या उडादाच्या बियाण्याची मोठी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. विशेषतः निर्मल सीडस कंपनीच्या बियाण्यांसाठी विक्रेत्यांनी आगाऊ नोंदणी केली आहे. तरीही उडदाच्या बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचे शेतकऱ्यांकडून तक्रारी येत होत्या. कृषी विभागाकडेही या तक्रारी आल्यानंतर अधिक चौकशी करता उडदाच्या बियाण्याची मुस्तीतील नागनाथ भीमशेट्टी यांच्या शेतात बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

Agriculture Seeds
Illegal Seed Seized : पिंपळोद येथे ११ लाखांचा बियाणे साठा जप्त

त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने ३० मे रोजी तेथे धाड टाकली आणि तेथून निर्मल सीड्‍स कंपनीच्या पायाभूत उडीद बियाणाच्या एन-१७० या वाणाच्या ३९ हजार २०० रुपयांची ५ किलोची २८ पाकिटे, २ हजार ८०० रुपयांची २५ ग्रॅमची रायझामिका नावाची बीजप्रक्रिया जिवाणूंची २८ पाकिटे, असा एकूण ४२ हजार रुपयांचा साठा आढळला. त्याशिवाय भीमशेट्टी याने या आधीच प्रति पाकीट १४०० रुपयांप्रमाणे ३ लाख ६ हजार ६०० रुपयांची २१९ पाकिटांची विक्री केल्याचे चौकशीत सांगितले.

...म्हणून गुन्हा दाखल

आता कंपनीने अधिकृतपणे विक्रेत्यामार्फत बियाणे विक्री न करणे, बियाण्यांची साठवणूक व विक्रीसाठी अधिकृत परवाना नसणे, पायाभूत उडीद बियाणांसाठीच्या टॅगसाठी शुभ्ररंग बंधनकारक असताना, सत्यतादर्शक टॅग असलेल्या बियाणे पाकिटांचा वापर करून अवैध पद्धतीने विक्री करणे, शेतकऱ्यांकडून प्रतिपाकिट १४०० रुपयांप्रमाणे रोख आणि ऑनलाईन पद्धतीने पैसे घेऊन बियाणांची विक्री करणे, ही कारणे देत संबंधित व्यक्तिसह कंपनीवर हा गुन्हा दाखल केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com