Sand Excavation : धनेगाव बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा

Illegal Sand Mining : लातूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मांजरा नदी देवणी तालुक्यातील जवळगा, हिसामनगर, हेळंब, धनेगाव या भागातून जाते.
Sand Mafia
Sand Excavation Agrowon
Published on
Updated on

Latur News : लातूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मांजरा नदी देवणी तालुक्यातील जवळगा, हिसामनगर, हेळंब, धनेगाव या भागातून जाते. पुढे निलंगा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शिऊर येथून परत देवणी तालुक्यात मांजरा नदी वाहते. धनेगाव येथे मांजरा नदीवर उच्चस्तरीय बंधारा उभारण्यात आल्याने नदीपात्रात बारा महिने पाणी असते. यात बेकायदेशीररीत्या बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जातो.

निलंगा व देवणी तालुक्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. बेकायदेशीर वाळू उपसा करण्यावर प्रशासनाने कडक कारवाई केल्याने वाळू उपसा बंद आहे. मात्र, शिऊर येथे देवणी तालुक्याच्या प्रवेशद्वारावर मांजरा नदीच्या पात्रातून दिवसरात्र दररोज हजारो ब्रास बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो.

महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे. बेकायदेशीर वाळू चोरीला कोणाची छत्रछाया लाभली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासन काय कारवाई करणार? हा असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Sand Mafia
Sand Mafia : वाळू माफियाकडून महिला प्रांताधिकाऱ्यांना धक्काबुक्की

शिऊर येथील मांजरा नदीच्या पात्रातून बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जातो. येथील सर्व प्रकारांची माहिती प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आहे, की ते बघ्यांची भूमिका घेतात, असाही प्रश्न उपस्थित होतो. येथील वाळूघाटांची निविदा घेतल्याप्रमाणे वाहतूक होत नसून याकडे सर्वच काणाडोळा करतात, अशी चर्चा मांजरा काठाच्या परिसरात होत आहे.

दरम्यान, निलंगा-उदगीर महामार्गालगत मान वळवून पाहिल्यावर मांजरा नदीपात्र दिसते. मग या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर वाळू उपसा का दिसत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

Sand Mafia
Illegal Sand Excavation : अवैध वाळू उपशाप्रकरणी २२ गुन्हे दाखल

वाळू पुरवठा योजना कागदावरच

विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरपोच वाळू पुरवठा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. पण वाळू डेपो फक्त कागदावरच राहिलेले आहेत. पुढे या निर्णयाचे काय झाले? हा संशोधनाचा विषय झालेला आहे.

वाळू उपसा शेतकऱ्यांच्या मुळावर

मांजरा नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून शेतशिवारातील पाणंद रस्ते वाळूच्या वाहतुकीने खराब होऊन खड्डे पडले आहेत. आधीच उशिरा शेतरस्ते तयार झाले होते, पण त्यात वाहतुकीने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com