Fish Conservation : सिल्व्हर पापलेटचे जतन ‘ऐरणी’वर

Silver Pomfret : राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गेल्या वर्षी सिल्व्हर पापलेट या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केला आहे; परंतु बेकायदा मासळीमुळे या पापलेटचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Silver Pomfret
Silver PomfretAgrowon
Published on
Updated on

Bhayandar News : महाराष्ट्रात सिल्व्हर पापलेटची संख्या आणि उत्पादन कमी होत आहे, असे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन)च्या अहवालात म्हटले आहे. यासाठी राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गेल्या वर्षी सिल्व्हर पापलेट या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केला आहे; परंतु बेकायदा मासळीमुळे या पापलेटचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

या माशाच्या संवर्धनासाठी सिल्व्हर पापलेट जतन समिती स्थापन करणे आवश्यक असल्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मत्स्योद्योग व्यवसायाला चालना मिळण्याकरिता आणि मच्छीमारांना जोडधंदे निर्माण करण्याकरिता राज्य सरकारने माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्योद्योग धोरण समिती स्थापित केली आहे.

Silver Pomfret
Fish Conservation : शास्रीय पद्धतीनेच करा पाकू मासा संवर्धन

या समितीकडून एकूण २२ मुद्दे नुकतेच जाहीर करण्यात आले. या २२ मुद्द्यांवर, तसेच अधिकच्या मुद्द्यांवर अभिप्राय, सूचना अथवा हरकती नोंदविण्याचे आवाहन मच्छीमारांना करण्यात आले आहे; परंतु बहुतांश मुद्दे हे फक्त दिखाव्यासाठी असून एकंदरीत भांडवलदारांना मागच्या दाराने मासेमारी व्यवसायात आणण्याचा प्रयत्न या धोरण समितीमार्फत होत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केला आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून सागरी मत्स्यव्यवसाय निगडित धोरणासंदर्भात अनेक हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या आहेत.

Silver Pomfret
Fish Conservation : शोभिवंत मत्स्यपालनात तयार झाली ओळख

गस्तीसाठी होतकरूंना प्राधान्य द्यावे

ही समन्वय समिती साप्ताहिक कार्यरत राहील आणि त्यांचा साप्ताहिक अहवाल सरकारच्या सर्व सुरक्षा विभागांना, मत्स्यव्यवसाय विभागाला देण्याचे प्रयोजन करील. ही समिती संपूर्ण सागरी सुरक्षेला जबाबदार राहील, अवैध मासेमारी रोखण्याची जबाबदारी पूर्णतः या समन्वय समितीवर राहील, गस्ती नौकांची संख्या वाढविणे आणि गस्ती नौकेवर मच्छीमार समाजातील होतकरू मुलांना नोकरभरती करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.

या आहेत मागण्या...

या माशाचे संरक्षण आणि जतन करण्याकरिता सिल्व्हर पापलेट जतन समिती स्थापन करणे, अवैध मासेमारी करणाऱ्यांना कठोर शिक्षेचे प्रयोजन करणे आणि ऑस्ट्रेलिया सरकार त्यांच्या जलधी क्षेत्रातील प्रजनन क्षेत्रात काही दिवस मासेमारीला बंदी घालते, त्या धर्तीवर सिल्व्हर पापलेटचे प्रजनन क्षेत्र सीमांकित करून प्रजनन काळात मासेमारी करण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.

अवैध मासेमारी, पर्ससीन नेट मासेमारीवर नियंत्रण, बर्फ कारखान्यांच्या वीजदरात सवलत, जमिनींचा विषय, विमा योजना, पावसाळी मासेमारी बंदी कालावधी ९० दिवसांचा करणे, आदी सूचना समितीतर्फे करण्यात आल्या आहेत.
- देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com