Yavatmal Bogus Seed Update : अनधिकृतरित्या वाहतूक होत असलेल्या बोगस खत साठ्यासह ट्रक असा एकूण १७ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (ता. २६) सायंकाळी कृषी विभागाच्या पथकाने नाका पार्डी येथे केली.
ट्रकचालक हरीश मनू कोकणी (वय ३५,रा. जमादार फलिया, ता. सोनगड, जि. तापी, गुजरात), वाहक हेमंत धनराज मराठे (वय २९, रा. जमादार फलिया, ता. सोनगड, जि. तापी, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली, की ग्रामपंचायत नाकापाडी येथील कार्यालयासमोर ट्रक थांबून असून त्यात जैवउत्प्रेरक नावाचे बोगस खत आहे. काही जण आर्थिक फायद्याकरिता अनधिकृतपणे बोगस खतांची शेतकऱ्यांना विक्री करीत आहे.
ही माहिती कळाल्यावरून छापा टाकण्यात आला. महिलेसह एक जण घटनास्थळावरून पळून गेला. खतसाठा व ट्रक असा एकूण १७ लाख ८४ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तथा पोलिसांनी केली.
नागपुरातील एका व्यावसायिकाचा हा साठा असून डिराइड प्रोटीन पावडर (डीएपी) असा पोत्यावर उल्लेख होता, अशी माहिती कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी दिली. या कारवाईत सुमारे १९३ बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आला. एका पोत्याची किंमत १४७५ रुपये आहे. त्यानुसार दोन लाख ८४ हजार रुपयांचा साठा असल्याचे त्यांनी सांगितले.
अनधिकृत खत विक्रीसाठी दोन मुलींची विक्री प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना गोणीमागे पन्नास रुपये कमिशन दिले जात होते. याप्रकरणी ट्रकचालक हरिश मनू कोकणी, क्लिनर हेमंत मराठे, दीपज्वाला कांबळे, वीरेंद्र सुरेश नासरे या चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.