ICAR: भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी डॉ. पाठक

डॉ. पाठक (Dr. Himanshu Pathak) यांनी यापूर्वी कटक येथील भारतीय भात संशोधन संस्थेच्या संचालक पदाचाही धुरा सांभाळली आहे.
Dr. Himanshu Pathak
Dr. Himanshu PathakAgrowon

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR-आयसीएआर) महासंचालक आणि केंद्रीय कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव या पदावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हिमांशू पाठक (Dr. Himanshu Pathak) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाठक बारामती येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंटचे संचालक म्हणून कार्यरत होते.

डॉ. पाठक यांनी यापूर्वी कटक येथील भारतीय भात संशोधन संस्थेच्या संचालक पदाचाही धुरा सांभाळली आहे. त्यांनी वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठामधून (Banaras Hindu University) कृषी शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये 'सॉईल सायन्स अँड ॲग्रीकल्चर केमेस्ट्री' या विषयात एम.एस्सी. पदवी घेतली. त्यांनतर त्यांनी त्याच संस्थेतून पीएच.डी. केली.

इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा (ASCA) यंग सायंटिस्ट अवॉर्ड, इंडियन सोसायटी ऑफ सॉईल सायन्स गोल्डन ज्युबिली कमोमोरेशन यंग सायंटिस्ट अवॉर्ड, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे (ASCA) डॉ. बी. सी. देब मेमोरियल अवॉर्ड, आयआरआरआयचा आऊटस्टँडिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी डॉ. पाठक यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग काम करतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR-आयसीएआर) कामकाज या विभागाकडून चालवले जाते. देशभरातील सर्व कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, संशोधन प्रकल्प आयसीएआरच्या अखत्यारित येतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com