VP Jagdeep Dhankhar : धनखड यांनी, काल सरकारला घरचा आहेर दिला आज विरोधकांना फटकारलं; म्हणाले मगरीचे अश्रू ढाळून नका

VP Jagdeep Dhankhar in Winter Session of Parliament : राज्यसभेत झालेल्या गदारोळावरून सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांविरोधात संताप व्यक्त केला आहे.
VP Jagdeep Dhankhar
VP Jagdeep DhankharAgrowon
Published on
Updated on

Pune News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी गदारोळ केला. यावेळी विरोधकांनी संसदेत एमएसपीच्या कायदेशीर हमीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. यावरून राज्यसभा सभापती जगदीप धनखड चांगलेच संतप्त झाले. त्यांनी थेट काँग्रेसह विरोधकांचा समाचार घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मगरीचे अश्रू ढाळून नका, अशी समज दिली. तसेच विरोधकांवर जोरदार निशाना साधत टीका केली. यावरून आता विरोधकांकडून टीका केली जात आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासह आंदोलनावरून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यांनी, आपल्याकडे भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) सारख्या महत्त्वाच्या संस्था असूनही, शेतकऱ्यांच्या अडचणीत आणि वेदना का कमी करू शकत नाही असा सवाल केला होता. तसेच सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं का पाळली नाही? असा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे पाहत केला होता. यानंतर धनखड यांची देशभर चर्चा सुरू झाली होती.

VP Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar : 'शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं का पाळली जात नाहीत?', उपराष्ट्रपती धनखड यांचा केंद्रीय कृषीमंत्र्यासह केंद्राला सवाल

आज धनखड यांनी अदानी, संभल हिंसाचार, मणिपूर प्रकरणावरून केंद्रावर हल्लाबोल करत गदारोळ करण्याऱ्या विरोधकांवर टीकेची झोड सोडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज राज्यसभेत गदारोळ झाला. काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी एमएसपीच्या कायदेशीर हमीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. यावरून त्यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस देत अध्यक्षांकडे परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली.

यावरूनच काँग्रेसह विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्रावर निशाना साधला. विरोधी खासदार घोषणाबाजी करत वेलमध्ये दाखल झाले. यानंतर सभापती जगदीप धनखड चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी विरोधकांवर मगरीचे अश्रू ढाळू नका, अशी टीका केली. तर काँग्रेसवाले आता शेतकऱ्यांच्या नावाने नाटक करत असून अधिवेशन सुरू होऊन आठवडा झाला आहे. मात्र एकदातरी यावर विरोधकांनी चर्चा केली का? फक्त वेलमध्ये दाखल होऊन घोषणाबाजी करून, अशा पद्धतीने मगरीचे अश्रू ढाळून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असे खडे बोल धनखड यांनी विरोधकांना सुनावले.

तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्हाला तोडगा नको आहे का? असा सवाल करताना शेतकरी हेच आपले शेवटचे प्राधान्य असायला हवे. पण तुम्ही गेल्या पाच दिवसापासून सभागृहात कामकाज होऊ दिलेले नाही. तर आता नियम २६७ अन्वये नोटीस देत चर्चेची मागणी करत आहात. तुम्ही दिलेल्या नोटीसपैकी एकही नोटीस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नव्हती आणि आता तुम्ही मगरीचे अश्रू ढाळत आहात. यावेळी धनखड यांनी इतर सदस्यांची नावे न घेण्याचा इशाराही देत सभागृहाचे कामकाज सुरू ठेवले.

VP Jagdeep Dhankhar
जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत अन्नदात्याला काठीने मारहाण केली जात असल्याचे सांगितले. किमान आधारभूत किमतीचे आश्वासन पाळले नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे शत्रू आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत अशी मागणी यांनी केली. तिवारी यांच्या वक्तव्यानंतर जयराम रमेश यांनी देखील आपले मत ठेवले. यावरून सभापती धनखड अधिकच संतापले.

धनखड म्हणाले की, जयरामजी, मला तोंड उघडायला लावू नका. तिवारी तुम्हाला परवानगी दिली आहे, जेणेकरून शिष्टाचार राखला जाईल. या वादानंतर सभापतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेस अनुमती न दिल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहातून सभात्याग केला.

दरम्यान काल जगदीप धनखड यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना धारवर धरत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडीमार केला होता. तर सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने का पूर्ण करत नाही, असा सवाल केला. वचन पाळण्यासाठी आपण काय करत आहोत? असे म्हटले होते. यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून आता काँग्रेसनेही टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी, 'आम्ही उपराष्ट्रपतींचा आदर करतो. ते राज्यसभेचे संरक्षक आणि राज्यघटनेचे रक्षक आहेत. त्यांनी विचारलेला प्रश्न काँग्रेसही गेल्या चार-पाच वर्षांपासून पंतप्रधानांना विचारत आहे. आम्हाला यावर चर्चा हवी आहे आणि नोटिसाही दिल्या आहेत, असेही जयराम रमेश यांनी म्हटले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com