Indian Agriculture : जमिनीचा शोध तहसिल कार्यालयातून कसा घ्यावा?

Jalna Land News : जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावात रामसिंग नावाचा एक शेतकरी राहत होता. रामसिंगकडे एक एकर शेती होती.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Land Update : जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावात रामसिंग नावाचा एक शेतकरी राहत होता. रामसिंगकडे एक एकर शेती होती. शेतीच्या उत्पन्नावर रामसिंग आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शेती फारशी पिकाऊ नसल्यामुळे रामसिंगची परिस्थिती थोडी नाजूक होती.

१९५० मध्ये अचानक रामसिंगच्या गावातील घराला आग लागली व त्या आगीमध्ये रामसिंगचे घर जळून खाक झाले. रामसिंगला काय करावे, ते सूचत नव्हते.

शेवटी रामसिंग स्वतःची शेती सोडून पोट भरण्यासाठी मुंबईत राहायला आला. मुंबईमध्ये मिळेल ते काम करून रामसिंग त्याचा संसार करू लागला. संसाराच्या आर्थिक अडचणीमुळे रामसिंग कित्येक वर्षे त्याच्या गावाकडे फिरकलाच नाही.

रामसिंगचे काही वर्षांनंतर १९९१ मध्ये वृद्धापकाळाने मुंबईतच निधन झाले. २००५ नंतर त्याच्या मुलाला आपल्या गावच्या एक एकर जमिनीची आठवण झाली.

Indian Agriculture
NA Land : ‘एनए’ परवानगीचे आता ग्रामपंचायतीला अधिकार

रामसिंगचा मुलगा त्याच्या गावात गेला असता गावातील काही लोकांनी त्याला सांगितले, की तू ती जमीन आता विसरून जा. परंतु रामसिंगच्या मुलाने हार मानली नाही. रामसिंगच्या मुलाने पुन्हा पुन्हा गावात जाऊन थोडी प्राथमिक माहिती घेऊन व तालुक्याच्या रेकॉर्ड वरून जमिनीचा शोध घेतला असता रामसिंगच्या मुलाने १९३० पासूनचे सर्व उतारे शोधले.

त्यात त्याला त्याच्या वडिलांच्या जमिनीचा शोध लागला. रामसिंगच्या मुलाला फार आनंद झाला. रामसिंगचा मुलगा जेव्हा त्याची जमीन बघायला गेला तेव्हा त्याला असे आढळून आले, की शेजारचा एक शेतकरी ती जमीन कसत होता.

रामसिंगच्या मुलाने भावकीला आणि मोठ्या माणसांना मध्ये घालून चर्चा घडवून आणली. जमीन फारशी पिकाऊ नसल्यामुळे थोड्याच दिवसांत रामसिंगच्या मुलाला त्याच्या वडिलांची जमीन परत मिळाली.

गावांच्या नावावरून जमिनीचा शोध घेणे आता शक्य आहे. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये बसून जमिनीचे पूर्वीचे रेकॉर्ड शोधता येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com