NA Land : ‘एनए’ परवानगीचे आता ग्रामपंचायतीला अधिकार

Non Agriculture Land : जमिनीचा वापर अकृषक (एनए) प्रयोजनासाठी करताना जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आता ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले असून गावापासून २०० मीटरच्या आत बांधकाम करताना स्वतंत्रपणे परवान्याची गरज नाही.
NA Land
NA LandAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : जमिनीचा वापर अकृषक (एनए) प्रयोजनासाठी करताना जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आता ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले असून गावापासून २०० मीटरच्या आत बांधकाम करताना स्वतंत्रपणे परवान्याची गरज नाही.

या बाबत महसूल विभागाने शासन आदेश काढला असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार दोन प्राधिकरणांकडे अर्ज करण्याची गरज नाही. नव्याने बांधकाम परवाना देताना बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीही विकसित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार शेतीसाठी उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमिनीचा वापर अकृषिक प्रयोजनासाठी करण्याकरिता किंवा एका अकृषिक प्रयोजनातून दुसऱ्या अकृषिक कारणासाठी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी गरजेची होती. मात्र त्यात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

NA Land
Land Management : जमिनीच्या आरोग्यासाठी हंगामपूर्व तयारीचे नियोजन कसे करावे?

विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा अंतिम झाल्यानंतर निवासी क्षेत्रातील बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला जात होता. या अर्जाची एक प्रत महसूल विभागाकडे पाठविली जात होती. महसूल विभाग संबंधित जमिनीचा अकृषिक कारणासाठी परवाना देताना त्याचे शुल्क भरून घेत असे. याची पावती पुन्हा ग्रामपंचायतीत जमा केली जात असे. त्यानंतर बांधकाम परवाना दिला जात असे.

NA Land
Land Conflict : शेत बांधाच्या भांडणात फावतं तिसऱ्याचं!

या प्रक्रियेत नगररचना विभागाच्या सहायक संचालकांची दोन्ही वेळा परवानगी घेतली जात होती. त्यामुळे त्याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता ग्रामपंचायतीकडे बांधकाम परवान्याचे अर्ज केल्यानंतर तेथेच अकृषिक परवाना शुल्क भरून घेतले जाणार आहे. यासाठी बांधकाम आणि विकसन परवाग्या देण्यासाठी बांधकाम परवानगी व्यवस्थापन ही ऑनलाइन प्रणाली वापरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार सक्षम अधिकाऱ्याने एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देताना स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. ती जमीन अकृषिक वापरात रूपांतरित झाल्याचे मानण्यात येत असल्याने अशा जमिनींबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास जमीनधारक, विकासकास स्वतंत्रपणे अकृषिक परवाना घेण्याची गरज नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com