Water Budget : पाण्याचे अंदाजकपत्रक कसे मांडायचे?

Water Management : मागील भागामध्ये पाण्याचे अंदाजपत्रक मांडण्याची आवश्यकता आणि फायदे यांची माहिती घेतली. या भागामध्ये उदाहरणादाखल काही तक्ते पाहू.
Water Management
Water ManagementAgrowon

सतीश खाडे

बहुतेकांच्या भीतीदायक स्वप्नामध्ये गणित विषय आजही पहिल्या क्रमांकावर असेल. त्यामुळे थोडी मोठी आकडेवारी, गणिते किंवा आकडेमोड आल्यास त्यापासून दूर पळण्यासाठी सामान्यांचा प्रयत्न असतो.

आजकाल गावपातळीवरील शिक्षणाचे प्रमाण वाढलेले असले, तरी पाण्यासंबंधित अवघड गणिते किंवा सूत्रे अडचणीची ठरू शकतात. उदा. जमिनीत मुरणारे पाणी व बाष्पीभवनातून कमी होणारे पाणी यांचा हिशेब इ. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये फार गुंतागुंताची सूत्रे, आकडेमोड टाळूनही कशा प्रकारे अंदाजपत्रक मांडता येते, ते पाहू.

कायदा

पाण्याचे अंदाजपत्रक केवळ शेती व गाव यासाठीच आवश्यक आहे असे नाही, तर ते पाण्याचा वापर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ते आवश्यक आहे. राज्यात २००५ पासून पाण्याचे अंदाजपत्रक सक्तीचे असल्याचा कायदाच आहे.

(महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ व महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५) या कायद्याद्वारे शहर, गाव, संस्थांच्या इमारती, इस्पितळे, कारखाने, धातूंच्या खाणी या आणि अशा पाणी वापर होणाऱ्या सर्वांसाठीच पाण्याचे अंदाजपत्रक व लेखापरीक्षण (वाॅटर ऑडिट) सक्तीचे आहे.

मोठ्या कंपन्या व बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्याकडे पाण्याचे ऑडिट करणे सुरू झाले आहे. येत्या काही दशकांतच अन्य क्षेत्रातही वाॅटर ऑडिट करणे अपरिहार्य होणार आहे. २०३० पर्यंत सर्व कारखान्यांनी पाण्याबाबत स्वयंपूर्ण होणे. निसर्गातून ते वापरासाठी घेत असलेले पाणी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वा इतरांच्या जागेत साठवणे.

पाणी प्रदूषण शून्यावर आणणे असे अनेक नियम केंद्र सरकारने लागू केले आहेत. त्यावरही अनेक कंपन्या सकारात्मक काम करत आहेत. कायदे पालनापेक्षाही स्वतःचे कर्तव्य आणि स्वयंशिस्त यासाठी काही संस्था व कारखाने पाण्याची अंदाजपत्रक दरवर्षी तयार करतात.

काही आश्‍वासक उदाहरणे

नांदेड जिल्ह्यातील प्रा. डाॅ. परमेश्‍वर पोळ हे गेली ८-१० वर्षे पाणी व पर्यावरणात काम करतात. ते प्रशासन व जनसामान्य या दोन्ही घटकांसोबत अनेक उपक्रम राबवतात. त्यांनी महाविद्यालय परिसराचे वॉटर बजेट तयार करून ते कॉलेजच्या भिंतीवरच रंगवून घेतले आहे. या सोप्या तंत्रानेही पूर्वीच्या तुलनेत काॅलेजचा पाणी वापर खूपच नियंत्रणात आला असल्याचे ते सांगतात. पावसाचे साठलेले अतिरिक्त पाणी शेजारच्या शेतकऱ्यांना पुरवले जाते.

पुण्यातील कात्रजच्या डोंगरात सुमती बालवन शाळेत पाणीविषयक अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांनीही त्यांच्या शाळेच्या पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यात मुलांनाही सामील केले जाते.

Water Management
Sangli Water Management : सांगलीकरांना दिलासा कोयनेतून विसर्ग दुप्पट, वाळणाऱ्या पिकांना आधार

कोळेगाव (जि. जालना) या साडेपंधराशे लोकसंख्येच्या गावाने २०१५-१६ पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले. सरासरी ६०० मि.मी. पाऊस पडणाऱ्या या गावात २०१५ व १६ या दोन्ही वर्षात अनुक्रमे फक्त २६० व ४०० मि.मी. पाऊस पडला होता. या भागात दर तिसऱ्या वर्षी अवर्षण ठरलेलेच असते. पण पाण्याचे अंदाजपत्रक करणे, त्यावर आधारित नियोजन करून या गावाने पाणी अडवणे व जिरवणे यावर भर दिला. सुरुवातीपासूनच WOTR या संस्थेचे या गावाला मार्गदर्शन लाभते आहे.

WOTR ही संस्था पाण्यासंदर्भात सामाजिक कार्य करते. या संस्थेने गेल्या काही वर्षांत २६४ गावांत पाण्याचे अंदाजपत्रक करून घेतले. त्यानुसार आवश्यक ती सातत्यपूर्ण कार्यवाही करण्यासाठी लोकांना प्रेरणा देऊन गावे पाण्याच्या बाबत आत्मनिर्भर झाली आहेत. या गावांमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी- मार्चमध्ये असे वर्षातून दोनदा पाण्याचे अंदाजपत्रक लोकांकडून मांडले जाते.

दोन्ही वेळी पावसाची सरासरी गेल्या पाच वर्षांची धरली जाते. तसेच फेब्रुवारी मार्चमधील अंदाजपत्रकांसाठी उपलब्ध पाण्याचा अधिक विचार करून गणिते केली जातात. त्यातून समोर आलेल्या पाण्याच्या तुटीवर चर्चा केली जाते. प्रत्येक बाबतीत कार्यवाही ठरवून अंमलबजावणी केली जाते. पाणी साठवणूक व त्यापेक्षाही पाणी वाचवणे यावर भर दिला जातो. सिंचनासाठी ड्रीप व स्पिंकलर वापरावर भर दिला जातो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक पद्धतीत बदल केला जातो. यामुळेच या गावांची पाण्याची तूट हळूहळू भरून निघत आहे. लवकरच अवर्षणाच्या वर्षातही त्यांना पाण्याची झळ बसणार नाही, अशा स्थितीत ही गावे पोहोचू शकतील.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

गाव क्षेत्रामध्ये पावसाचे मिळणारे पाणी

तपशील एकक (माप)

गावाचे एकूण क्षेत्रफळ हेक्टरमध्ये

गावातील लोकसंख्या

पिण्याच्या व वापराच्या पाण्याची गरज घनमीटरमध्ये

पिकासाठी वापरले जाणारे पाणी घनमीटरमध्ये

पावसाचे येणारे पाणी घनमीटरमध्ये

परिसरात साठवलेले पाणी घनमीटरमध्ये

वाहून जाणारे पाणी घनमीटरमध्ये

गावाची पाण्याची गरज घनमीटरमध्ये

अजून किती पाणी अडवण्याची संधी घनमीटर

Water Management
APMC Evaluation : सर्वच बाजार समित्यांचे मूल्यमापन करा

गावक्षेत्रातून वाहणारे पाणी (अपधाव)

तपशील क्षेत्रफळ (हेक्टर) उतार (टक्के) अपधाव किंवा वाहणारे पाणी (टक्के) (X) एकूण पडलेला पाऊस (घनमीटर प्रति वर्ष) अपधाव (घनमीटर)

(X x Y/१००)

जंगल / डोंगराळ प्रदेश -- >२० -- -- --

लागवड नसलेले क्षेत्र -- ५ ते २० -- -- --

लागवडीखालील क्षेत्र -- <५ -- -- --

गावातून होणारे एकूण अपधाव -- -- -- -- --

गाव शिवारात साठवलेले पाणी भाग : १

जलसंधारण रचना संख्या एकूण साठवण (घनमीटर)

चेक डॅम (सिमेंट बंधारा) -- --

शेततळे -- --

पाझर तलाव -- --

मातीचे बंधारे -- --

केटी वेअर -- --

जलसंधारणाद्वारे साठवलेले

एकूण पाणी --

गाव शिवारात साठवलेले पाणी भाग : २

कामाचा प्रकार प्रक्रिये- खालील क्षेत्र (हेक्टर) साठवण प्रति युनिट (घनमीटर प्रति हेक्टर) एकूण साठलेले पाणी (घनमीटर)

सलग समतल चर (सलग उताराकरिता) -- -- --

कंटूर बंडिंग -- -- --

वृक्ष लागवड -- -- --

जमीन सपाटीकरण -- -- --

ट्रिगर्ड ट्रेंचिंग -- -- --

जलसंधारणातून साठलेले एकूण पाणी --

माणसे व जनावरे यांची पाण्याची वार्षिक गरज

तपशील संख्या प्रमाणित वापर (घनमीटर प्रति वर्ष) एकूण पाणी आवश्यकता (घनमीटर)

गावाची लोकसंख्या -- -- --

गाई व अन्य मोठ्या जनावरांची संख्या -- -- --

शेळ्या, मेंढ्याची संख्या -- -- --

कोंबड्यांची संख्या -- -- --

माणूस व प्राण्याकडून होणारा एकूण पाणी वापर (प्रति वर्ष) --ॉ

गावाच्या पूर्ण क्षेत्रावरील पिकांची पाण्याची गरज

तपशील क्षेत्रफळ (हेक्टर) प्रमाणित पाणी आवश्यकता (घनमीटर प्रति पाण्याची पाळी) एकूण पाणी देण्याची संख्या एकूण पाणी आवश्यकता प्रति वर्ष (घनमीटर)

खरीप हंगाम

बाजरी -- -- -- --

कडधान्य -- -- -- --

वाटाणा -- -- -- --

भुईमूग -- -- -- --

अन्य पिके -- -- -- --

रब्बी हंगाम

ज्वारी -- -- -- --

कांदा -- -- -- --

चवळी -- -- -- --

गहू -- -- --

अन्य पिके -- -- -- --

वार्षिक पिके

फळबाग -- -- -- --

चारा पिके -- -- -- --

अन्य पिके -- -- -- --

पिकांना आवश्यक एकूण पाणी --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com