अधिक माहितीसाठी...महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे.या योजनेत ५ ते २५ मेट्रिक टन क्षमतेच्या चाळीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.अनुदानाचा उद्देश कांद्याचे नुकसान टाळणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करणे आणि चांगला भाव मिळवून देणे हा आहे.पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर किंवा कृषी कार्यालयात ऑफलाइन अर्ज करता येतो.या योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुक यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत..Pune News: राज्य सरकारने कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘कांदा चाळ अनुदान योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक करता येणार येईल तसेच उत्पादनाचे नुकसान टाळता येणार आहे. या योजनेअंतर्गत किमान ५ मेट्रिक टन ते कमाल २५ मेट्रिक टन क्षमतेच्या चाळीसाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे..योजनेचा उद्देशया योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कांद्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे शेतकरी बाजारातील दरातील चढ-उतारांपासून वाचू शकतील, नासाडी टळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित राहण्यास मदत होईल..Krishi Sanjeevani Horticulture Scheme: सरकारकडून शेतीसाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज.योजनेचे फायदेशेतकऱ्यांना कांदा सुरक्षित ठेवता येईल.कांदा जास्त दिवस खराब न होता टिकेल.बाजारभाव कमी-जास्त झाला तरी नुकसान कमी होईल.शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता वाढेल.उत्पन्न सुरक्षित राहील आणि नफा वाढेल..अनुदानाचे स्वरूप (नवीन GR नुसार)५ ते २५ टन : प्रति टन १०,००० रुपये खर्च गृहीत, जास्तीत जास्त ५,००० रुपये अनुदान.२५ ते ५०० टन : प्रति टन ८,००० रुपये खर्च, जास्तीत जास्त ४,००० रुपये अनुदान.५०० ते १,००० टन : प्रति टन ६,००० रुपये खर्च, जास्तीत जास्त ३,००० रुपये अनुदान..Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान.चाळ बांधणीचे निकषलांबी: ६ ते १२ मीटररुंदी: ३ ते ५ मीटरउंची: १.५ ते २ मीटरसाठवण क्षमता: कमाल २५ मेट्रिक टन वैयक्तिक / ५०० मेट्रिक टन गटासाठीछप्पर: पत्रा / टिन / प्लास्टिक कोटर (स्थिर)बांधकाम कालावधी: मंजुरीनंतर २ महिन्यांत पूर्ण करणे आवश्यककांदा चाळ जमिनीपासून ६० सें.मी. उंच असावी.चाळीची लांबी दक्षिण-उत्तर दिशेला, जास्त पावसाच्या ठिकाणी पूर्व-पश्चिम दिशेला असावी..पात्रतेच्या अटीअर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.अर्जदाराच्या ७/१२ व ८अ उताऱ्यावर कांद्याचे पीक असणे आवश्यक आहे.यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.चाळ मंजुरीनंतर २ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे.शासनाने ठरवलेले तांत्रिक निकष (लांबी, रुंदी, उंची, छप्पर) पाळणे आवश्यक आहे.अर्जदाराकडे आधार कार्ड व आधार लिंक असलेले बँक खाते असावे.गटाने अर्ज केल्यास सर्व सदस्यांचा ठराव व नोंदणी कागदपत्रे आवश्यक आहेत.अर्जदाराने स्वतःची घोषणा द्यावी की पूर्वी योजना घेतलेली नाही.बांधकामाच्या आधी व नंतरचे फोटो द्यावे लागतील..आवश्यक कागदपत्रेशेतकरी ओळखपत्रआधार कार्डआधार लिंक असलेले बँक पासबुकजात प्रमाणपत्र (जर लागू असेल)कांदा विक्रीची पावती (APMC/NAFED)स्वयंघोषणापत्र (मागील लाभ घेतला नाही याचा)चाळ बांधणीचे फोटो (बांधकाम पूर्वी/नंतर)गट अर्ज असल्यास संस्था ठराव आणि नोंदणी प्रमाणपत्र.अर्ज प्रक्रियाअनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा महाडीबीटी (https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.तसेच, ऑफलाइन अर्जासाठी शेतकऱ्याने तालुक्याच्या कृषी कार्यालयातून अर्ज फॉर्म घेऊन तो आवश्यक कागदपत्रांसह भरून सादर करावा लागतो..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)१. कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.२. अनुदानासाठी अर्ज कुठे करावा लागतो?अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन किंवा तालुका कृषी कार्यालयात ऑफलाइन करता येतो.३. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती अनुदान मिळू शकते?या योजनेनुसार, प्रति टन ५,००० रुपये (कमाल २५ टन क्षमतेसाठी) अनुदान मिळू शकते.४. चाळीचे बांधकाम किती दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे?मंजुरी मिळाल्यानंतर २ महिन्यांच्या आत बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे.५. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आणि कांदा विक्रीची पावती यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.