अधिक माहितीसाठी...राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना सुरू केली आहे.या योजनेत शेतकऱ्यांना ताडपत्रीच्या खरेदीवर ५० टक्के अनुदान मिळते.शेतकऱ्याला ताडपत्रीच्या एकूण किमतीपैकी फक्त अर्धी रक्कम भरावी लागते.रलेली रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण करता येते..Pune News: राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीवर ५० टक्के अनुदान दिले जाते. यात शेतकऱ्याला ताडपत्रीच्या एकूण किंमतीपैकी केवळ अर्धी रक्कम भरावी लागते आणि उरलेली रक्कम थेट आधार-जोडणी केलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात पिकांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे..योजनेचा उद्देशया योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी मदत करणे आहे. या अंतर्गत, शेतकरी त्यांच्या पिकांवर ताडपत्री आच्छादून त्यांचे संरक्षण करू शकतात. यामुळे, पावसामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी होते..Onion Storage Subsidy Scheme: शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी मिळणार ५० टक्क्यांपर्यंत अनुदान.योजनेचे फायदेअवकाळी पावसामुळे पिकांचे संरक्षण मिळणार आहे.ताडपत्रीवर ५० टक्के अनुदान मिळत असल्याने आर्थिक बचत होईल.शेतकरी आर्थिक संकटातून वाचतात तसेच मानसिक स्थिरताही मिळते.बहुउपयोगी साधन: घरगुती कार्यक्रम, तात्पुरते शेड, गोदाम किंवा बाजार स्टॉल्ससाठी उपयोग होईल..लाभार्थी पात्रताअअर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आणि शेतकरी असणे बंधनकारक आहे.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आणि ते बँक खात्याशी जोडलेले असणे अनिवार्य आहे, कारण अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतीची जमीन असणे आवश्यक आहे.या योजनेत लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना, तसेच अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते..Fodder Cutter Machine Scheme: अर्ध्या किमतीत मिळणार कडबा कुट्टी मशीन; ५० टक्के अनुदानाची सरकारी योजना!.योजनेच्या अटीजर शेतकऱ्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर तो पुन्हा अर्ज करण्यास पात्र नाही.शेतकऱ्याने अधिकृत विक्रेत्याकडून ताडपत्री खरेदी करावी आणि त्याचे पक्के बिल प्राप्त करावे. अनुदानासाठी हे बिल पुरावा म्हणून सादर करावे लागते.अर्ज पंचायत समिती, गट विकास अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयात सादर करावा.अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान एका महिन्याच्या आत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल..आवश्यक कागदपत्रेशेतकऱ्याचे ओळखपत्र.आधार कार्डजात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती असल्यास आवश्यक)अपंगत्व प्रमाणपत्र (अपंग असल्यास)बँक पासबुकताडपत्री खरेदीचे बिल (बीआयएस प्रमाणित ताडपत्रीचे पक्के बिल)उत्पन्नाचा दाखला.अर्ज प्रक्रियाराज्य सरकारने महाडीबीटी योजनांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ पद्धत लागू केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)१. ताडपत्री अनुदान योजनेत किती टक्के अनुदान मिळते?शेतकऱ्यांना ५०% पर्यंत अनुदान मिळते.२. अनुदानाची रक्कम कशी मिळते?उर्वरित रक्कम थेट आधार-जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाते.३. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.४. योजनेत अर्ज कसा करावा?अर्ज महाडीबीटी, जिल्हा परिषद व कृषी विभागामार्फत करावा लागतो.५. ताडपत्रीचा उपयोग कशासाठी होतो?पिकांचे अवकाळी पाऊस, गारपीट व इतर हवामान बदलांपासून संरक्षण करण्यासाठी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.