Sitafal Parishad : प्रत्येक पिकापासून किती अपेक्षा ठेवायच्या हे निश्चित करायला हवे

Latest Agriculture News : सीताफळ महासंघ व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या समन्वयाने १८ व्या राज्यस्तरीय सीताफळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष म्हणून श्री. बोराडे उपस्थित होते.
Sitafal Parishad
Sitafal Parishad Agrowon

Jalana News : प्रत्येक पिकापासून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे प्रत्येक पिकापासून आपली अपेक्षा नेमकी किती ठेवावी हे शेतकऱ्यांनी निश्चित करायला हवे, असे परखड मत मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे अध्यक्ष कृषिरत्न विजय अण्णा बोराडे यांनी व्यक्त केले.

सीताफळ महासंघ व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या समन्वयाने १८ व्या राज्यस्तरीय सीताफळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी अध्यक्ष म्हणून श्री. बोराडे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील माजी उपाध्यक्ष विजय कोलते, प्रगतशील शेतकरी जयंत महाले आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे आणि अखिल भारतीय सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाचे अध्यक्ष श्याम गटांनी तसेच संघाचे उपाध्यक्ष एकनाथ आगे, सचिव अनिल बोंडे उपस्थित होते.

Sitafal Parishad
Sitafal Production : सीताफळाची मृग बहारातील फळधारणा घटली

श्री. गट्टानी प्रास्ताविकात म्हणाले, की एक लाख हेक्टर क्षेत्रावर सिताफळाच्या विविध वाणांची लागवड झाली आहे. महासंघाने दोन दशकांत विविध कार्यक्रम राज्यामध्ये राबवले. विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामार्फत संशोधन आणि मूल्यवर्धन या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे.

श्री बोराडे म्हणाले, की सिताफळ महासंघाचे लक्ष सिताफळ प्रक्रियेवर अधिक आहे. हवामान बदलाच्या कालखंडात सिताफळ व तुती पीक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीताफळ लागवड करण्याचा विचार करावा. डॉ. मोटे म्हणाले, सीताफळाची राज्यात मोठी लागवड झालेली आहे.

Sitafal Parishad
Sitafal Market : पूर्वहंगामी सिताफळाला ९ हजार रुपये दर

रेस्यूडी फ्री फळे, भाजीपाला उत्पादनासाठी लवकरच तीनही जिल्ह्यात शेतकऱ्यांची कार्यशाळा घेतली जाईल. श्री. कोलते म्हणाले, की सीताफळातील गरामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे. सीताफळ महासंघाचे नाव आता डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा संघाच्या रांगेत येते आहे.

पाहिल्या तांत्रिक सत्रात श्री. मुंदडा यांनी मार्गदर्शन करताना परागीकरणाविषयी माहिती दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी संचालक संशोधन डॉ. विनय सुपे यांनी सिताफळाचे महत्त्व, त्याचे गुणधर्म याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे पाटील, अनिल बोंडे व अशोक इंगळे यांनी केले.

प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

सीताफळ उत्पादनात उत्कृष्ट काम करणारे प्रगतशील शेतकरी नवनाथ कसपटे (बार्शी), शाश्वत मुंदडा (अमरावती), विजयराव कोलते (पुणे), करमाड येथील डाळिंब जातीचे निर्माते विठ्ठल भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com