Sitafal Market : पूर्वहंगामी सिताफळाला ९ हजार रुपये दर

Fruit Market Update : राज्याच्या काही भागात एप्रिल, मे महिन्यात झालेल्या पावसामुळे फूलधारणा, सेटिंग आणि फळधारणा होत सिताफळे परिपक्‍व झाली.
Sitafal Market
Sitafal MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : राज्याच्या काही भागात एप्रिल, मे महिन्यात झालेल्या पावसामुळे फूलधारणा, सेटिंग आणि फळधारणा होत सिताफळे परिपक्‍व झाली. अशी फळे कळमना बाजारात काही प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. गेल्या दोन दिवसांत ३० क्‍विंटल सीताफळांची आवक नोंदविण्यात आली.

व्यापाऱ्यांकडून देखील याची खरेदी होत आहे. पूर्वहंगामी असलेल्या या फळांना सुरवातीला ५,००० ते ७००० रुपये दर होता. त्यानंतर आवक कमी झाल्याने दर तेजीत येत ६ हजार ते ९ हजार रुपयांवर पोचले.

सीताफळ महासंघाचे पदाधिकारी असलेल्या विनय बोथरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताफळाला पाणी दिले की फूलधारणा होते. त्यामुळेच एप्रिल, मे महिन्यात काही भागात पाऊस झाला.

Sitafal Market
Golden Sitafal : गोल्डन सीताफळांचा बाजारपेठेत घमघमाट

त्यामुळे फूल आणि फळधारणा झाली. बागायतदारांनी छाटणी दरम्यान फळे काढली नाहीत. अशी फळे आता विक्रीसाठी आली आहेत. सासवड परिसरात देखील उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सीअसपेक्षा कमी राहते.

परिणामी या भागात दोन बहार घेतले जातात. फेब्रुवारीत सेटिंग करून जून महिन्यात फळे मिळतात. त्यानंतर दुसरा बहार लगेच जून महिन्यात त्या भागातील शेतकरी घेतात. जून महिन्यात मृग बहाराची फळे मिळतात. जून महिन्यात फूलधारणा होऊन १२० दिवसांत फळे परिपक्व होतात.

Sitafal Market
Sitafal Production : सीताफळाची मृग बहारातील फळधारणा घटली

आर्दता योग्य राहिल्यास पाणी दिल्यानंतर १५-२० दिवसांनी सीताफळाला फुले येतात. जून महिन्यातील बहराच्या फळांची उपलब्धता बाजारात सप्टेंबर १५ पासून होते. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने सप्टेंबरअखेर किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळे बाजारात येतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

हंगामाच्या अखेरीस दर घटण्याची शक्यता

सध्या बाजारात आवक होणारी फळे ही पूर्वहंगामी आहेत. त्याला ७ हजार रुपये ते ९ हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. यंदा हंगामी फळे बाजारात आल्यानंतर त्यांना देखील असाच दर मिळेल, असे विनय बोथरा सांगतात. हंगामाच्या अखेरीस मात्र सीताफळाचे दर कमी होतात. ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत ते खाली जातील, अशी शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com