Pratap Chiplunkar : शेतकऱ्यामधला लेखक अॅग्रोवननं कसा घडवला ?

Article by Pratap Chiplunkar : दररोज १६ पाने भरून लोकांपुढे आणण्यासाठी इतके साहित्य कसे उपलब्ध होऊ शकेल, हा प्रश्‍नच होता. परंतु दैनिक सुरू झाले आणि आमची शंका फोल ठरली.
Pratap Chiplunkar
Pratap ChiplunkarAgrowon

Pratap Chiplunkar :

सकाळ समूहा’ने १८ वर्षांपूर्वी शेतीसाठी एक स्वतंत्र दैनिक सुरू करण्याचा संकल्प सोडला व तो पुढे प्रत्यक्षात आणला. त्या काळात मी लेखक होण्याच्या मार्गावरील पहिल्या काही इयत्ता उत्तीर्ण झालो होतो. शेतीवर एक १६ पानांचे दैनिक सुरू होतेय, हा एक जसा कौतुकाचा विषय होता, तसा चिंतेचाही होता. दररोज १६ पाने भरून लोकांपुढे आणण्यासाठी इतके साहित्य कसे उपलब्ध होऊ शकेल, हा प्रश्‍नच होता. परंतु दैनिक सुरू झाले आणि आमची शंका फोल ठरली.

मी पहिल्या दिवसापासून या वृत्तपत्राचा वाचक आहे. या वृत्तपत्रासाठी आपले लेखन स्वीकारले जावे, यासाठी मला पहिले काही महिने उमेदवारी करावी लागली. आमची जमीन १५-२० वर्षे वापरून खराब झाली होती व उत्पादन पहिल्यासारखे मिळत नव्हते. त्यासाठी योग्य सुधारित तंत्राच्या शोधात मी होतो. त्यासाठी विविध ग्रंथांचा अभ्यास करत होतो.

Pratap Chiplunkar
Pratap Chiplunkar : पिकांनाही सहजीवनाचा आनंद घेऊ द्या

त्या काळात जमिनीची सुपीकता हा फार मोठ्या अभ्यासाचा विषय नव्हता. कृषी विद्यापीठाच्या पातळीवर, एकरी २०-२५ गाड्या शेणखत-कंपोस्ट टाका म्हणजे जमीन सुपीक होईल, या एका वाक्यात सुपीकतेचा विषय संपवून टाकला जात असे. नव्याने सुरू झालेल्या ‘ॲग्रोवन’मध्येही या विषयावर फारसा मजकूर छापून येत नसे.

मी तसे तक्रारवजा पत्र पाठवले. त्यामुळे संपादकांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल, आपली कानउघडणी केली जाईल, असे मला वाटू लागले. आणि एकेदिवशी सकाळीच संपादकांचा फोन आला. दैनिकातील कमतरता दाखवून दिल्याबद्दल त्यांनी चक्क माझे आभार मानले व इथून पुढे सुपीकतेसंबंधीचे लेखन जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.

Pratap Chiplunkar
Indian Agriculture : देरे मोत्यावाणी दाणं देवा माझ्या कणसाला

पुढे ते आश्‍वासन पाळण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. परंतु या विषयातील लेखनच मुळात जास्त उपलब्ध होत नसावे. या गोष्टीला आता १६ वर्षे झाली.शेतकरी पातळीवर आज याबाबत काय धारणा आहेत, याचा अभ्यास केल्यास शेतकरी उत्पादनवाढीबद्दल जितका विचार करतो, त्यात माझी जमीन सुपीक झाली पाहिजे, हा ध्यास केव्हा सार्वत्रिक होईल, याचे उत्तर आजही सापडणार नाही, असे खेदाने म्हणावे लागते.

एकेदिवशी ॲग्रोवनचे दोन प्रतिनिधी कोल्हापुरात माझ्या घरी आले व शेत पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही शेतावर गेलो. तेथे शिवारफेरी व मुलाखत असा दुहेरी कार्यक्रम झाला. माझा अंदाज होता एखाद्या पानावर या मुलाखतीला जागा मिळेल. परंतु पुढे ५ डिसेंबर २००६ पासून पूर्णपान सलग सहा लेखांच्या मालिकेतून या विषयला प्रसिद्धी देण्यात आली.

एखाद्या शेतकऱ्याची इतकी प्रदीर्घ मुलाखत एकमेवच असावी, असा माझा अंदाज आहे. अशा काही प्रसंगांतून संपादकीय सहकाऱ्यांशी दोस्ती वाढत गेली, ती आजतागायत कायम आहे. अनेक कारणांनी माझ्या पुणे भेटी होत, त्यात या दैनिकाच्या कार्यालयाला भेट हा एक कायमचा कार्यक्रम ठरून गेला.

(संपुर्ण लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com