Hiware Bajar Development : एकीच्या बळातून जगभर हिवरेबाजारची ओळख

Rural Development : गावकऱ्यांच्या एकोप्यातून त्यातून पस्तीस वर्षांत गावाने देश आणि जगपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली. हे सारे एकीचे बळ आहे.
Hiware Bajar
Hiware Bajar Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : कुस्तीगिरांचे गाव म्हणून राज्य पातळीवर नावलौकीक असलेल्या हिवरेबाजार गावांत व्यसनाधिनतेमुळे अधोगतीकडे गेले होते. पस्तीस वर्षांपूर्वी हिवरेबाजार गावाने श्रमदानातून विकासात्मक कामाला सुरवात केली. चराई बंदी, कुऱ्हाड बंदी, पाणी अडवा-पाणी जिरवा, नशाबंदी, वृक्षारोपण अशा पंचसूत्रीतून गावकऱ्यांना एकत्र केले गेले. आपण आपल्या गावांसाठी करतोय ही भावना प्रत्येकात रुजली गेली.

गावकऱ्यांच्या एकोप्यातून त्यातून पस्तीस वर्षांत गावाने देश आणि जगपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली. हे सारे एकीचे बळ आहे. गावकऱ्यांचेच नव्हे सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे योगदान असल्याचे सांगताना पद्मश्री पोपटराव पवार यांनी पस्तीस वर्षांचा गावचा पट उलगडत जुन्या आठवणीला उजाळा दिला.

हिवरेबाजार वृक्षारोपण मासनिमित्त आयोजित कार्यक्रमात मातृस्मृती वनमंदिर परिसरात ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून एकूण १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू आहे. यासाठी दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या वृक्षारोपण केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकारांच्या कुटुंबाच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम झाला.

हिवरेबाजारच्या विकासात पत्रकारांचे योगदान अधिक असल्याचे सांगत पोपटराव पवार यांनी संवाद साधत हिवरेबाजारच्या प्रगतीमधील ३५ वर्षांचा पट उलगडला, जुन्या आठवणीला उजाळा दिला. शोभा पवार यांच्यासह सरपंच विमलताई ठाणगे, सोसायटीचे चेअरमन छबूराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, सखाराम पादीर, रोहिदास पादीर, अशोक गोहड, संजय पवार, आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Hiware Bajar
Rural Development: शेतीकामासाठी मजूर का मिळत नाही?

१९९० मध्ये युवकांना एकत्र करत गावात बदल करण्याचा निश्चय करत श्रमदानातून एक हजार खड्डे खोदून चिंचेची झाडे लावली. संगोपनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली. त्या रोपांचे आता डोरेदार वृक्ष झाली आहेत. पाणी अडवा-पाणी जिरवा मोहीम राबवली, चर खोदले. श्रमदानाने झालेल्या विकासातून गावाची ओळख झाली. पाच हजारावर पुस्तके असलेले ग्रंथालय आहे. लोकसहभागातून गाव विकासाचे मॉडेल अशी ओळख झाली. देशविदेशातून हजारो पुरस्कार मिळाले असल्याचे पोपटराव पवारांनी सांगितले.

Hiware Bajar
Rural Development : शाश्‍वत विकासामध्ये ग्रामपंचायत केंद्रस्थानी

दुधाचा हिवरेबाजार ब्रॅन्ड करणार

पोपटराव पवार म्हणाले, ‘‘गावातील शेतकऱ्यांनी गायी-म्हशी पालनातून दूध धंदा सुरू केला आहे. या दुधात पाणी वा अन्य कोणतीही भेसळ नसते. येथील दुधाला थेट ग्राहकांकडून मागणी आहे. आता हिवरेबाजारच्या कसदार असलेल्या या दुधाचा आता हिवरे बाजार ब्रँड केला जाणार आहे. तो राज्यात व देशात पाठवला जाणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय करण्यासाठीही प्रयत्न असेल.’’

२२ कोटींचे कांदे विकले...

आदर्शगाव हिवरे बाजारचे क्षेत्र ९७६ हेक्टरचे आहे. गावची लोकसंख्या सोळाशे असून, ३१० कुटुंबे गावात आहेत. गावातील सर्वच घरांवर घरातील महिलेचे नाव वरच्या बाजूला. त्याखाली कर्त्यापुरुषाचे नाव आहे. कांदा हे मुख्य पीक असून, भाजीपाला, धान्य पिके घेतली जातात. यावर्षी गावातील शेतकऱ्यांनी २२ कोटींचा कांदा पिकवून विकला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com