Modern Agriculture : रायगडमध्ये आधुनिक शेतीकडे वाढता कल

Agriculture Technology : कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या जात असल्याने त्‍याचा लाभ शेतकरीवर्गातून घेतला जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आधुनिक शेती करण्याकडे कल वाढला आहे.
Agriculture technology
Agriculture technology Agrowon
Published on
Updated on

Raigad News : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शेतकरी आता हायटेक तंत्रज्ञानाच्‍या माध्यमातून शेती करू लागले आहेत. त्‍यामुळे वेळ आणि पैशांची बचत होऊ लागली आहे. कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या जात असल्याने त्‍याचा लाभ शेतकरीवर्गातून घेतला जात आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आधुनिक शेती करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा, अंग मेहनत वाचू लागली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात उत्‍पादन मिळू लागले आहे. पूर्वी लाकडी नांगर आणि बैलजोड्यांच्या माध्यमातून शेती केली जात, मात्र आता बैलजोड्यांची किंमत आवाक्याबाहेर गेली आहे.

शिवाय त्‍यांना राखण्यासाठी गुराखीदेखील ठेवावा लागतो, तर भाड्याच्या बैलजोडीसाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्‍यातच मजुरांचे दरदेखील वाढल्याने शेती खर्चिक होऊ लागली आहे. सध्या मजुरांना दिवसाकाठी पाचशे ते सातशे रुपये मोजावे लागतात, मात्र कृषी विभागाकडून मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या जात असल्याने त्‍याचा लाभ शेतकरीवर्गाला मिळू लागला आहे.

नुकतेच विविध साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना थेट ५० टक्‍के अनुदान देण्यात येत आहे. त्‍यामुळे विविध हायटेक साहित्याच्या माध्यमातून शेती केली जात आहे. यामध्ये सध्या पॉवर टिलरचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. पाॅवर टिलरचे एका तासाचे भाडे ६०० ते ७०० रुपये आहे, तर ट्रॅक्टरचे एका तासाचे भाडे ८०० ते १००० रुपये आहे.

Agriculture technology
Agriculture Industry Modernization : कृषी प्रक्रिया उद्योगाला हवे अत्याधुनिकीकरण

यामुळे अवघ्या दोन ते तीन तासात एक हेक्टर शेतीची नांगरणी व चिखलणी सुलभरीत्या होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत तसेच पैशांची बचत होत आहे. पॉवर टिलर व इतर कृषी साहित्य खरेदीसाठी विविध योजना कृषी विभागाकडून राबवल्या जात आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पावर टिलरची खरेदी केली आहे.

Agriculture technology
Modern Agriculture Technology: आधुनिक यंत्रांना हवी तंत्रज्ञानाची जोड

५० टक्‍के अनुदान

कृषी यांत्रिकरण उपअभियान व राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ५० टक्के अनुदानावर यंत्र, अवजारे उपलब्ध करून दिले जातात. त्यामध्ये चालू वर्षापासून ट्रॅक्टरसाठी वैयक्तिक अनुदान बंद केले असले तरी भाडेतत्त्वावर सेवा सुविधा देण्यात आली आहे, तर अवजारांसाठी ४० टक्के किंवा १० लाखापर्यंत बँक अनुदान उपलब्ध राहणार आहे.

भातशेतीसाठी महत्त्वपूर्ण अवजारे जशे पॉवर टिलर (१४ एच. पी.) साठी ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १,२०,००० रुपये, पॉवर विडर (५ एच. पी. पेक्षा जास्त) साठी ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये इतके अनुदान उपलब्ध आहे. तसेच भातकापणी, भातझोडणी मशीन यासाठीदेखील अनुदान उपलब्ध असल्याची माहिती पेण कृषी अधिकारी सागर वारकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com