Orange Disease : संत्रा बागायतदारांना हेक्‍टरी ५० हजारांची मदत करा

Orange Production : अनिश्‍चित पाऊसमानामुळे संत्रा पिकात बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव व त्यातून होणारी संत्रा फळांची गळ यामुळे संत्रा उत्पादक जेरीस आला आहे.
Orange Growers
Orange Growers Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : अनिश्‍चित पाऊसमानामुळे संत्रा पिकात बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव व त्यातून होणारी संत्रा फळांची गळ यामुळे संत्रा उत्पादक जेरीस आला आहे. ही बाब लक्षात घेता संत्रा उत्पादकांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर करावे, अशी मागणी संत्रा बागायतदारांनी केली आहे.

तसेच, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या संदर्भाने सादर केलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, राज्यात सर्वाधिक १ लाख हेक्‍टर संत्रा लागवड क्षेत्र हे विदर्भात आहे. अमरावती जिल्हा त्यासोबतच अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांतील सातपुडा पर्वत रांगांच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणावर संत्रा लागवड करण्यात आली आहे.

Orange Growers
Orange Fruit Drop Survey : संत्रा फळ गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

या भागातील वातावरण हे संत्रा पिकासाठी पोषक आहे. त्यामुळेच या भागात उत्पादित संत्र्याचा दर्जाही इतर भागातील फळांपेक्षा चांगला राहतो. असे असताना गेल्या ८ ते १० वर्षांपासून या भागात अनियमित व अनिश्‍चित पाऊसमानामुळे संत्रा पीक धोक्‍यात आले आहे.

Orange Growers
Orange Producer : संत्रा बागायतदारांसाठी ‘सीसीआरआय’ची उपयोगिता शून्य

पावसामुळे बुरशीजन्य रोग बागेत वाढतात त्यातूनच फळगळ होते. यामुळे उत्पादकता प्रभावित झाली असताना बांगलादेशने आयात शुल्कात केलेली वाढ व आता बांगलादेशमधील अस्थिर स्थितीमुळे निर्यात प्रभावित झाली आहे. एकीकडे कीडरोगाच्या परिणामी उत्पादकता घटलेली आणि दुसरीकडे निर्यातीअभावी दरही कमी अशा कोंडीत संत्रा बागायतदार सापडला आहे.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. त्याची दखल घेत संत्रा बागायतदारांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांप्रमाणे भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनकर्त्यांमध्ये शिरीष महाले, शुभम महाले, भास्कर कोळसकार, मनीष महाले, किशोर बोंद्रे, ओमचंद महाले, सागर भालतिलक, सुधीर बोंद्रे, राहुल हिंगणकर, शशिकांत चेडे, राजेश राहणे यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com