Agricultural Aid: खरिपासाठी शेतकऱ्यांना मदत करा : सुप्रिया सुळे

Supriya Sule: भोर व राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलर ऊर्जा योजनेचा जास्ती जास्त लाभ घ्यावा. प्रशासनाने तालुक्यात अवकाळी पावसाने झालेले नुकसान व खरिपाच्या तयारीबाबत येणाऱ्या अडचणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी.
Supriya Sule
Supriya SuleAgrowon
Published on
Updated on

Nasrapur News: ‘‘भोर व राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलर ऊर्जा योजनेचा जास्ती जास्त लाभ घ्यावा. प्रशासनाने तालुक्यात अवकाळी पावसाने झालेले नुकसान व खरिपाच्या तयारीबाबत येणाऱ्या अडचणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,’’ अशा सूचना सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला केली.

नसरापूर (ता. भोर) येथे दोन्ही तालुक्यांच्या प्रशासकीय अधिकऱ्यांसमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत खासदर सुळे बोलत होत्या. या बैठकीस भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन, राजगडचे नायब तहसीलदार तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी,

Supriya Sule
Farmer Financial Relief: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना अखेर मदत निधी मिळाला

सुनील इडोळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी महादेव कोंढरे, रवींद्र बांदल, संदीप नांगरे, गणेश खुटवड, संतोष रेणसे, शंकरराव भुरुक, भगवान बांदल, प्रदीप मरळ, विठ्ठल शिंदे, वंदना धुमाळ, विद्या यादव, दुर्गा चोरघे, नसरापूरचे यशवंत कदम आदी उपस्थित होते.

Supriya Sule
Supriya Sule Kolhapur : सिंचन घोटाळा प्रकरण! सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

या वेळी बैठकीत अनेक ग्रामस्थ तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरिपाच्या अडचणींबाबतच्या समस्या मांडल्या. शिवरे येथील दादा डिंबळे यांनी देखील भोर तहसीलदार कचेरीच्या कारभारावर टीका केली. उत्रौली येथील शेतकऱ्याने जमिनीवर पडलेले एमआयडीसीचे शिक्के निघणार होते ते अद्याप निघाले नसल्याचे सांगितले. तसेच शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी कापूरहोळ-भोर रस्त्याचे काम निकृष्ट व दिरंगाईने होत असल्याची तक्रार केली.

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी धर्माधिकारी यांनी खरिपाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. खते बियाणांच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे गणेश खुटवड यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com