Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर

Rain Forecast : उत्तरेकडे मॉन्सून सरकत असताना मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : उत्तरेकडे मॉन्सून सरकत असताना मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत नाशिकमधील वडाळी मंडलात ११०.५ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, हिंगोली व विदर्भातील अकोला, वाशीम, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे खरिपात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद अशा पेरण्यांना सुरुवात होणार आहे.

गेल्या आठवड्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

मराठवाड्यातही मागील तीन दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. मात्र, लातूर भागात पावसाचा जोर कमी होता. आता या भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले आहे. पडलेल्या पावसामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून ठिकाणी खरिपाच्या कामांना वेगात सुरुवात झाली आहे.

Rain Update
Monsoon Rain : माॅन्सूनची विदर्भात मुसंडी; राज्याच्या अनेक भागात ४ दिवस पावसाचा अंदाज

कोकणात पावसाचा प्रभाव कमी
कोकणात मागील चार ते पाच दिवसांत दमदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. या पावसामुळे अनेक ठिकाणी भात खाचरे भरली असून भाताच्या रोपवाटिकांच्या कामांना वेग आला आहे.

दोन दिवसांपासून काही अंशी ढगाळ वातावरण असून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. तर पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे.

मध्य महाराष्ट्रात कमीअधिक पाऊस :
मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची उघडिप दिली असून काही प्रमाणात ढगाळ वातावरण कायम आहे. नाशिक, सोलापूर, नगर भागात पावसाचा जोर कमी अधिक आहे. खानदेशात ढगाळ वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सलगपणे पाऊस होतो आहे. बुधवारी (ता. १२) पुन्हा मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार थांबून-थांबून सुरूच राहिली.

जिल्ह्यात आतापर्यंत १५०.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, ९१ मंडलांपैकी १९ मंडलात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील भीमा, सीना, नागझरी या प्रमुख नद्या तुडुंब भरुन वाहू लागल्या आहेत. नाशिकमध्ये गेल्या बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. तर पाच दिवसांपासून चांदवड,नांदगांव, इगतपुरी, देवळा, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यात चांदवड तालुक्यात पाच दिवसांत जिल्ह्यात सर्वाधिक १३६ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीच्या दुप्पट पाऊस असून २६८.६ टक्के येथे पावसाची नोंद झाली आहे.

Rain Update
Weather Forecast : वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार :

मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, धाराशिव व परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर अत्यंत कमी राहिला. बहुतांश मंडलांत पावसाची हजेरी तुरळक हलक्या स्वरूपाची होती. पावसाने दिलेल्या उसंतीमुळे पेरणीची गती वाढण्याची आशा आहे.

हिंगोली व परभणीतील ६६ मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ४ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी राहिला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल १४ जणांचा जीव गेला असून त्यापैकी अंगावर वीज पडून ११ व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

विदर्भात पाऊस वाढू लागला :

विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत मॉन्सूनचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बसरत आहेत.

तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे विदर्भातील वातावरणात वेगाने बदल होत असून उन्हाचा पारा अचानक कमी झाला आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. आणखी जोरदार पाऊस झाल्यास खरीपाच्या पेरण्यांना वेळेवर सुरुवात होईल, अशी आशा आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्त्रोत : कृषी विभाग)

कोकण : ठाणे : मुंब्रा ५८.५, वेंगुर्ला ३६.३, अगशी ३४.५, डहाणू ५१.३, मालवण ५१.३, चिंचणी ३६.५, सफाळा ४४.३, आगरवाडी ३४.५, तारापूर ४८.८, तळवडे ४०.५.

मध्य महाराष्ट्र : मनमाड ६०, रानवड ५०, दिघवद ५६, लोणावळा ९३, इंदापूर ७७, मार्डी ५७, बोरामणी ५६.८, मुस्ती ५२.८, सुर्डी ७७.०, खांडवी ६९.३, शेटफळ ५२.८, माढा ६३.८, दारफळ ८४.५, कुर्डुवाडी ७९.५, म्हैसगाव ६३.८, रांझणी ८५.८, कोर्टी ७२, महाबळेश्‍वर ६८.३.

मराठवाडा : अंबड ५२.५, औसा ६०.३, किल्लारी ६१.८, उजनी ५२.३, कासार बालकुंड ७३.५, आंबुलगा ६२.८, मदनसुरी ५४.८, कासारशिरसी ५५.५, हलगरा ४८.३, भातमुंगळी ४६.८, बेंबळी ५८.३, कासेगाव ६२.३, मंगरूळ ७०, इतकल ५२.८, परांडा ६७, आसू ५१, डाळिंब ९२.५, मुरूम ९२.५, माकणी ६७.५, तेरखेड ५१.८, हिंगोली ६८.५, सिरसम, बासंबा, माळहिवरा ७९, जळगाव ८६.३, असळगाव ५१.३.

विदर्भ : सिंदखेड ५९.३, अकोलखेड ८८.३, पातूर ६३.८, मूर्तिजापूर ७८.८, पोटी ७८, इंझोरी ६६.८, हिवरा ५७, उंबरडा ५४.५, पोहरा ५०, ब्राह्मणवाडा ६२.३, मेटिखेडा ५०.८, बोरी ७१.३, अरनी ७०.३, भिवापूर ५७.८, आमगाव ५४.५, अरमोरी ५३.३, कमलापूर ६०.८, देसाईगंज ५०.३, शंकरपूर ६९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com