Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांतील १०७ मंडलांत अतिवृष्टी

Heavy Rain Crop Damage : संपूर्ण पावसाळ्यात मराठवाड्यावर अवकृपा करणाऱ्या पावसाने रविवार (ता. २६) दुपारनंतर सुरुवातीला रिमझिम हलका मध्यम पडत रात्री उशिरा वादळ वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Chhatarapati Sambhajinagar News : संपूर्ण पावसाळ्यात मराठवाड्यावर अवकृपा करणाऱ्या पावसाने रविवार (ता. २६) दुपारनंतर सुरुवातीला रिमझिम हलका मध्यम पडत रात्री उशिरा वादळ वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील तब्बल १०७ मंडळात अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे पावसाचा जोर सर्वाधिक होता. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतही अनेक भागांत पावसाची जोरदार हजेरी लागली.

अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला, मका, रब्बी ज्वारीचे पीक आडवे झाले. काही ठिकाणी झालेल्या तुरळक गारपिटीमुळे पिकांना चांगलाच तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता.

जिल्ह्यातील जवळपास ३२ मंडळात अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, जालना, अंबड, परतूर, बदनापूर, घनसावंगी, मंठा आदी तालुक्यांत पावसाचा जोर पाहायला मिळाला. या सर्व तालुक्यातील जवळपास २७ मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यांतर्गंत येत असलेल्या तलवाडा या एकमेव मंडळात अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Hailstrom Crop Damage : द्राक्ष, रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार, लोहा, हदगाव, अर्धापूर या तालुक्यांतील जवळपास १२ मंडळात अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातही पावसाचा जोर जालना जिल्हा पाठोपाठ राहिला. जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पूर्णा, सेलू, मानवत आदी तालुक्यांतील २३ मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातही पावसाचा जोर पाहायला मिळाला. जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा या तालुक्यांतील १२ मंडळात अतिवृष्टी झाली.

हिंगोली व औंढा तालुक्यांत तुलनेने पावसाचा जोर अधिक होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६०.८ मिलिमीटर तर जालना जिल्ह्यात सरासरी ७०.७ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी ६५ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यात सरासरी ६५.८ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यात सरासरी ३६.५ मिलिमीटर, बीड जिल्ह्यात सरासरी २७.२ मिलिमीटर तर लातूर जिल्ह्यात सर्वात कमी सरासरी १.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यात पाऊस नाही.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळे (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर

उस्मानपुरा ७४, भावसिंगपुरा ८५.५०, कांचनवाडी ७९, चौका ८६.५०, कचनेर ६८, पंढरपूर ७३.७५, अडुळ ९३.५०, बिडकीन ६८.२५, पाचोड ६८, मांजरी ६८.२५, भेंडाळा ६९, तुर्काबाद ७८.५०, वाळूज ७३.७५, डोणगाव ९९.७५, आसेगाव ६७.२५, शिऊर ८७.५०, गारज ७६, महालगाव ७०.७५, जानेफळ ६८, कन्नड ६७, चापानेर ६७, देवगाव ७२.२५, पीशोर ८६.२५, नाचनवेल ७९.५०, चिंचोली ६६.७५, वेरूळ १०७.५०, सुलतानपूर १०३.७५, बाजार सांगवी ८६, गोळेगाव ६६.५०, आमठाणा ७३.२५, बोरगाव ७७.२५, फुलंब्री ८९.५०,

Crop Damage
Hailstorm Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने पिके जमीनदोस्त

जालना जिल्हा

भोकरदन ९५.७५, पिंपळगाव ७२.५०, केदारखेडा ७५.७५, जाफराबाद ७१.७५, कुंभारझरा ७७.७५, टेंभुर्णी ८०.५०, जालना शहर १०४.२५, वाघरूळ १३२.२५, नेर ७६.२५, शेवली ८१.५०, रामनगर ७८.५०, पाचनवडगाव ७८.५०, जामखेड ७२.५०, रोहिलागड ८१.५०, गोंदी ७०, वडीगोद्री ७२.७५, वाटुर ६८.७५, बदनापूर ९३.२५, शेलगाव १३२, बावणे पांगरी ९२.५०, रोशनगाव ९०.५०, तीर्थपुरी ९०.२५, कुंभार पिंपळगाव ७२.५०, अंतरवाली ७१.७५, तळणी ७४.२५, ढोकसाल ७७.२५, पांगरी ८३.५०.

बीड जिल्हा

तलवाडा ७५.२५.

नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा प्राथमिक अहवाल

१) छ. संभाजीनगर : मृत जनावरे - मोठी ५ (गाय ४, बैल १), ३ शेळ्या

२) जालना : मृत जनावरे - मोठी ३ ( १ बैल, १ गाय, १ म्हैस ) - लहान -१५ मेंढ्या

४) हिंगोली ः मयत व्यक्ती - १, मयत जनावरे -१ वासरू, २ शेळ्या

५) नांदेड : मृत जनावरे - १ म्हैस, २ शेळ्या

असे झाले नुकसान

सागर गणपत निकम, नादगाव, ता. वैजापूर गट न ४३ येथे रात्री वीज पडून सागर निकम याचा बैल मरण पावला.

खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद येथील शेतकरी बाळू लक्ष्मण महालकर यांची एक गाय रात्री झालेल्या पावसामध्ये वीज पडून मयत झाली.

देऊळगाव वाडी येथील संतोष महादूसिंग चरावंडे यांच्या शेळ्या : मोठ्या-२ व लहान १ अवकाळी पावसात मरण पावल्या.

सिल्लोड तालुक्यात तीन शेळ्या व एक बैल विजेसह झालेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडला.

धामणगाव, ता. फुलंब्री येथील नाना श्रीपत वाहूल यांचे घराजवळ वीज पडल्याने गृहपयोगी वस्तू व अंदाजे २० क्विंटल कापूस जळाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com