Flood Condition : संयुक्त अरब अमिरातीत मुसळधार पावसामुळे पूर

Flood Due to Rain : संयुक्त अरब अमिरातीला मंगळवारी (ता. १६) मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Flood Condition
Flood ConditionAgrowon

Dubai Floods : संयुक्त अरब अमिरातीला मंगळवारी (ता. १६) मुसळधार पावसाने झोडपले. पश्चिम आशियातील देश संयुक्त अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या देशात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वांत मोठा फटका दुबईला बसला आहे. दुबईला येणारी अनेक विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आहेत.

Flood Condition
Kolhapur Flood : नद्यांमधील गाळ निघण्याची शक्यता धूसर, पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा?

दुबईत अनेक महामार्गांवर पाणी साठल्याने नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यावरच सोडून द्यावी लागली. शेजारच्या ओमान देशातही मुसळधार पावसामुळे पूर आला असून, मृतांची संख्या १९ वर गेली आहे.

मुसळधार पावसामुळे रस्ते, वाहने पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वाधिक व्यग्र विमानतळापैकी एक आहे. या विमानतळाच्या परिसरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे अनेक उड्डाणे काही काळासाठी थांबवण्यात आली.

Flood Condition
World Bank Flood Control : कोल्हापूरचा महापूर रोखण्यासाठी पूरनियंत्रण आराखड्यास जागतिक बँकेकडून मंजुरी

भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या उड्डाणांना याचा मोठा फटका बसला. मंगळवारी सायंकाळपर्यंत दुबईत १२० मिमी पाऊस झाला. दुबईतील शाळांनाही सुट्टी देण्यात आली. सरकारी कर्मचारीही घरीच राहिले. रस्त्यावरील पाणी काढण्यासाठी प्रशासनाने टँकर पाठवले. अनेक घरांतही पाणी घुसले.

बहारीन, कतार आणि सौदी अरेबियातही मुसळधार पाऊस झाला. शेजारच्या ओमान देशात मुसळधार पावसामुळे मागील काही दिवसांत १९ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्या देशाच्या आपत्कालीन यंत्रणेकडून देण्यात आली. यामध्ये एक गाडी वाहून गेल्याने १० शाळकरी मुलांसह एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com