Satara Rain Update : सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

Rain News : सातारा तालुक्यातील अनेक गावात दुपारपासून पावसास सुरवात झाली. रात्रीच्यावेळी पावसाचा जोर वाढला होता.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी दमदार पावसाने झोडपून काढले. गेले तीन दिवस कमीजास्‍त प्रमाणातपरिसरात पाऊस हजेरी लावत आहे. सकाळपासूनच वातावरणात कमालीची उष्‍णता वाढली होती.

दुपारी तीननंतर पावसाने मेघगर्जनेसह विविध भागांस झोडपून काढण्‍यास सुरवात केली. रात्री उशिरापर्यंत कमीजास्‍त प्रमाणात विविध भागांत पाऊस सुरूच होता. सततच्‍या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सातारा तालुक्यातील अनेक गावात दुपारपासून पावसास सुरवात झाली. रात्रीच्यावेळी पावसाचा जोर वाढला होता. पाटण, कऱ्हाड तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. पाटण तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र कोयना धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही. महाबळेश्वर तालुक्यात पाऊस झाला आहे. या पावसामुळे नुकतीच सुरू झालेली स्ट्रॅाबेरी लागवडी परिणाम होणार आहे.

Rain Update
Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये ९३ पैकी ७५ मंडलांत अतिवृष्टी

काही शेतात पाणी साचल्याने कामे ठप्प होणार आहेत. वाई शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाने पाचवड परिसरात चांगलीच दैना उडाली. मंगळवारचा दिवस आठवडी बाजार असल्याने आजूबाजूच्या परिसरातील आलेल्या लोकांची गैरसोय झाली.

Rain Update
Heavy Rain Damage : पुसदमध्ये अतिवृष्टिग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याची मागणी

सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असून, भाजीपाला खरेदीसाठी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जोमाने आलेली भात पिके दाणेदारपणे बाहेर पडत आहेत; परंतु असाच पावसाचे जोर राहिल्यास उभी पिके भुईसपाट होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होणार आहे. घेवडा, चवळी, उडीद अशा कडधान्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे. सोयाबीन पिकाचे देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे उसाचे मुळ्या ढिल्या झाल्याने अनेक ठिकाणी ऊस आडाव झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com