Satara Rain : सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Rain Update : गेल्या आठ दिवसांहून अधिक पावसाने दडी मारली होती. पावसाने दडी मारल्याने वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ३४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठ दिवसांहून अधिक पावसाने दडी मारली होती. पावसाने दडी मारल्याने वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता. शनिवारी सायंकाळी जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावत झोडपून काढण्यास सुरुवात केली.

Crop Damage
Monsoon Rain : पहिल्याच पावसात २१ तलाव फुटले

माण तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. इतर दहाही तालुक्यात सायंकाळी पावसाने झोडपून काढले आहे. रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने पिके आडवी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही शेतात पाणीही साचले आहे.

मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली होती. पिकांना पाणी देण्यास सुरुवातही केली होती. शनिवारी झालेल्या पावसाने पिकांना उपयुक्त ठरणार आहे. खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या सातारा, जावळी, पाटण, कऱ्हाड, वाई तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

सातारा ३७.८, जावळी ३४.२, पाटण ४८.०, कऱ्हाड ३१.२, कोरेगाव ५५.५, खटाव ४१.७, माण ८, फलटण १७.३, खंडाळा २६.२, वाई ३५.२, महाबळेश्वर २२.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com