Marathwada Rain : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस

Rain Update : छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील बहुतांश मंडलात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम तर काही ठिकाणी दमदार हजेरी लागली.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील बहुतांश मंडलात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम तर काही ठिकाणी दमदार हजेरी लागली. सर्व दूर पाऊस दिसत असला तरी पावसाळ्याची सुरुवात बघता बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांतील मंडलांचा अपवाद वगळता पावसाचा जोर कमीच असल्याची स्थिती आहे.

छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यातील ८४ पैकी ८१ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगर मंडलांत ११.३ मिलिमीटर, नांदूर ४.३, लोहगाव ४.३, ढोरकीन १५, बिडकीन ७.३, पैठण ४.८, पाचोड २०.८, विहामांडवा ८.५, आपेगाव ४.८, निलजगाव ७.३, गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा ६.५, सिद्धनाथ वडगाव ४.८, गाजगाव ४.८, जामगाव ३.८, डोनगाव ३.३, वैजापूर तालुक्यातील वैजापूर ७.८, बोरसर ४.३, लोणी ३.३, महालगाव ५.८, कन्नड तालुक्यातील देवगाव ५.३, खुलताबाद तालुक्यातील वेरूळ मंडलात ४.८, बाजार सांगवी ४.८, सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव मंडलात ४.३, पालोद ३.५, उंडणगाव ६.३ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain
Heavy Rain : यवतमाळातील १४ मंडलांत अतिवृष्टी

जालना जिल्हा

जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ मंडलात तुरळक, हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील जालना ग्रामीण मंडलात ७.५, वाघरूळ ५.३, नेर ६.५, शेवली १२.५, विरेगाव ५.५, रामनगर १५.३, पाचणवडगाव ११.८, अंबड १३.५, धनगर पिंपरी ७.८, जामखेड २१.३, गोंदी १९.५, वडीगोद्री १४, सुखापुरी ३४.५, परतुर ९, वाटुर १०.८, आष्टी १३.५, श्रीष्टी १५.८, सातोना १६.५, बावणे पांगरी ३.३, घनसावंगी ३०.३, राणी उचेगाव ७.५, तीर्थपुरी २४, कुंभार पिंपळगाव २०.५, अंतरवली २९.३, रांजणी ७, जाम समर्थ २०.५, मंठा ३.३, तळणी ११, ढोकसाळ ७.३, पांगरी ६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Rain
Rain Alert : विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

बीड जिल्हा

जिल्ह्यातील ६३ पैकी ६२ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील गेवराई, केज, पाटोदा, परळी तालुक्यांत पावसाचा जोर थोडा अधिक होता. जिल्ह्यातील बीड तालुक्यातील बीड मंडलात ६.८ मिलिमीटर, पाली ४.८, नाळवंडी ३.५, पिंपळनेर ८.५, पेंडगाव ३.५, मांजरसुंबा ११.५, चौसाळा ६.८, नेकनूर ९.८, लिंबागणेश १६.८, पाटोदा तालुक्यातील पाटोदा मंडलात २१.३, दासखेड २६.८, थेरला १३.८, अमळनेर ५.५, आष्टी तालुक्यातील आष्टी ७.३, कडा १०.८, टाकळसिंग १२, पिंपळा ३.८, गेवराई तालुक्यातील गेवराई २५.५, मादळमोही २०.८, जातेगाव ५१, पाचेगाव २५.५, धोंडराई ७, उमापूर ३८.५ ,

चकलांबा ३०.५, सिरसदेवी २०.८, रेवकी १०, तलवाडा ५१, माजलगाव तालुक्यातील माजलगाव १५.८, गंगामसला ११.८, किट्टी आडगाव २०.८, तालखेड ३९, नित्रुड १५, दिंद्रुड ३०, अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई ९, पाटोदा ९.३, लोखंडी सावरगाव १३.३, घाटनांदूर ५.५, बर्दापूर १६.३ ,केज तालुक्यातील केज २०.३, यूसुफ वडगाव ५.५, हनुमंत पिंपरी १६, विडा १०, बनसारोळा १३, नांदूरघाट २६, परळी तालुक्यातील परळी ९.३,नागापूर १०.५, शिरसाळा ३१.८, पिंपळगाव २०.३, धारूर तालुक्यातील धारूर ११.३, तेलगाव १५, मोहखेड ६.८ ,वडवणी तालुक्यातील वडवणी ६.८, कौडगाव ११.५, शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा ४.३ तर तिंतरवणी मंडलात ११.५ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com