Maharashtra Rain : कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा जोर

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी (ता. २) दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत मध्यम जोरदार पाऊस सुरू होता.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी (ता. २) दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत मध्यम जोरदार पाऊस सुरू होता. पूर्व भागात मात्र एक दोन तासांनी एखादी हलकी सर व ढगाळ हवामान असे स्वरूप राहिले.

मंगळवारी (ता. २) सकाळी सातपर्यंतच्या आकडेवारीनुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव असे ९ बंधारे पाण्याखाली आहेत.

Maharashtra Rain
Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

धरण क्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेसह अन्य छोट्या उपनद्यांना पाणी आले आहे. कृष्णा वगळता अन्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे कासारी नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन यंदा प्रथमच कासारीचे पाणी पात्राबाहेर पडले.

Maharashtra Rain
Weather Update : विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असून पर्यायी मार्गावरून सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ३९.२ मिमी पावसाची नोंद झाली.

गगनबावडा येथे ३८ मिमी पाऊस नोंदवला गेला. दुपारी एक वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ २० फुटांवर होती. सर्वच धरणांच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com