Khandesh Rain : खानदेशात पावसाचे धूमशान

Rain Alert : जळगाव तालुक्यातील कानळदा, भोकर, नशिराबाद या महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात शनिवारी (ता.१३) व रविवारी (ता.१४) अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. रविवारी चोपडा, जळगाव भागात अतिवृष्टी झाली आहे. धुळ्यात तुरळक तर अन्य भागात मध्यम ते हलका पाऊस होता. खानदेशात मागील आठवड्यात मंगळवार (ता.९) ते शनिवारपर्यंत (ता.१३) अपवाद वगळता पाऊस नव्हता. दुपारी उष्णता, ऊन अशी स्थिती होती. उकाडाही वाढला होता. शनिवारी रात्री काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला. पहाटेपर्यंत जोरदार पाऊस अनेक भागात झाला. जळगाव तालुक्यातील कानळदा, भोकर, नशिराबाद या महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद, गोरगावले महसूल मंडळातही जोरदार पावसाने धुमाकूळ केला आहे. यामुळे जमिनी खरडून गेल्या असून, शेतातील ठिबक नळ्या वाहून गेल्या आहेत. जळगाव तालुक्यातील फुपनगरी ते वडनगरी यादरम्यानचा रस्ता वाहून गेला आहे. तसेच फुपणी ते गाढोदे यादरम्यानच्या रस्त्यालाही भगदाड पडले असून, या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील अडावद गावात पाणीच पाणी झाले. शाळेच्या प्रांगणात तलाव झाला आहे.

Rain
Maharashtra Heavy Rain : अठ्ठावीस मंडलांत अतिवृष्टी

अनेक भागात हलका पाऊस

शनिवारी व रविवारी जळगाव जिल्ह्यात धरणगाव, चोपडा,जळगाव, जामनेर या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु पारोळा, बोदवड, भडगाव, अमळनेर, रावेर आदी भागात तुरळक ते हलका पाऊस झाला. रविवारचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) जळगाव - ८१, भुसावळ १०, यावल २०, रावेर ०.८, मुक्ताईनगर ०.५, अमळनेर ७, चोपडा ५२, एरंडोल १५, पारोळा ५, चाळीसगाव ९, जामनेर २५, पाचोरा १२, भडगाव ६, धरणगाव ३०, बोदवड ७. जळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात एकूण ६३२ मिलिमीटर पाऊस पडतो यातील ४० टक्के पाऊस १४ जुलैपर्यंत झाला आहे. जळगाव तालुक्यातील पाऊसमान सर्वाधिक आहे. धुळे जिल्ह्यातही हलका पाऊस झाला. जिल्ह्यात एकूण ५६५ मिलिमीटर पाऊस पडतो.

Rain
Maharashtra Rain : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात सर्वदूर हलका, मध्यम, दमदार पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्के पाऊस झाला आहे. रविवारी धुळ्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. धुळे, साक्री परिसरात अर्धा तास मध्यम पाऊस झाला. शिंदखेडा, शिरपूर भागातही हलका पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात रविवारी काही भागातच पाऊस होता. नवापूर तालुक्यात ७० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील पाऊसमान ८३५ मिलिमीटर असून, एकूण सरासरीच्या ३१ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची तूट जिल्ह्यात सध्या आहे.

या मंडळांत अतिवृष्टी

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव तालुक्यातील कानळदा, नशिराबाद, भोकर, चोपड्यातील अडावद, धानोरा महसूल मंडळांत रविवारी अतिवृष्टी झाली. त्यात कानळदा मंडळात ८७ मिलिमीटर, नशिराबादमध्ये ११७ मिलिमीटर, अडावदमध्ये १५१ मिलिमीटर, धानोऱ्यात १३१ मिलिमीटर पाऊस झाला. जळगाव तालुक्यातील उत्तर पश्चिम भागातील शेतांत पाणी साचले आहे. कानळदा भागातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द, आव्हाणे, जळगाव, विदगाव, ममुराबाद, भोकर परिसरातील गाढोदे, कठोरा, किनोद, सावखेडा खुर्द, करंज , पळसोद, जामोद, आमोदे खुर्द, भालदी खुर्द, भोकर आदी भागात शेतांत पाणीच पाणी झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com