Rain Update : बीड, धाराशिवमध्ये पावसाचा जोर अधिक

Beed Rain News : मराठवाड्यातील बीड व धाराशिवमध्ये शुक्रवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील बीड व धाराशिवमध्ये शुक्रवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला. या दोन जिल्ह्यातील १५ मंडलांत अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने अपवाद वगळता उसंत घेतल्याची स्थिती होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात काही भागात तुरळक हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी, बीड, पाटोदा, गेवराई, केज, शिरूर कासार तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद आदीं तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता.

Monsoon Rain
Jalgaon Rain News : पावसाचा धुमाकूळ; चारा, पिकांची हानी सुरूच

तालुकानिहाय सरासरी पाऊस

बीड जिल्हा ः

धारूर ३०.९, वडवणी ६१.५, शिरूर कासार १९.८, बीड ४९.६, पाटोदा ३३.९, आष्टी ०.४, गेवराई १७.२, माजलगाव २.३, अंबाजोगाई १.६, केज १९.९, परळी ९.६.

जालना जिल्हा ः

भोकरदन १६.१, जाफराबाद १४.९, जालना ११.३, अंबड १९.५, परतुर ५.८, बदनापूर १८, घनसावंगी १५, मंठा ६.

Monsoon Rain
Rain Crop Damage: मॉन्सूनपूर्व पावसाचा दोन हजार हेक्टर पिकांना फटका

धाराशिव जिल्हा

धाराशिव २७.८, तुळजापूर ३५.४, परांडा ३१.६, भूम ६५.९, कळंब ४५.२, उमरगा ४९.९, लोहारा ५१.९, वाशी ४३.९.

अतिवृष्टीची मंडले

बीड जिल्हा ः मांजरसुंबा ७५.२५, चौसाळा ६७.७५, धारूर ६५.७.

धाराशिव जिल्हा ः

धाराशिव ग्रामीण ६५.७५, सलगरा ६७, जवळा ७३.५०, माणकेश्वर ७३.५०, भूम ६७.७५, ईटकुर ७५.५०, मोहा ६५.७५, डाळिंब ६५.५० मुरूम ६५.५०, लोहारा ६७, जेवळी ६५.५०.

आपत्‍कालीन घटना

जालना तालुका

बेथलम (ता.जालना) येथील संदिप लक्ष्मण परळकर यांची म्हैस वीज पडून मृत्यू

नसडगाव (ता. जालना) येथील कैलास साहेबराव मिसाळ यांच्या २ शेळ्याचा मृत्यू.

भोकरदन तालुका

सोयगाव देवी येथील प्रल्हाद यादवराव सहाणे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली.

सोयगाव देवी येथील काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये गट नंबर १८१ मधील सुमित्राबाई गणपत सहाने यांची नवीन बांधलेली विहीर खचून पडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com